हिंगोली (Adv. Vijay Raut) : अॅड. विजय राऊत यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की, अॅड.विजय राऊत फिर्यादी असलेल्या गुन्ह्याचा तपास हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये चालू असून तपासीक अधिकार्यांनी वेळोवेळी त्यांना माहिती देऊनही त्या प्रकरणाशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांचा कोणताही संबंध नसताना त्यांना धमकी वजा खोटे नाटे अर्ज देऊन उपोषण आंदोलन करून त्यांच्यासह साक्षीदारांची प्रतिम मलीन करून त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याने २४ सप्टेंबरला हिंगोली शहर पोलिसात पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या फिर्यादीवरून (Adv. Vijay Raut) विजय ज्ञानबा राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच याप्रकरणात असराजी उर्फ पप्पू सुरेश चव्हाण यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांच्यावर १ सप्टेंबरला गोळीबार झाला होता. त्यात हिंगोली पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून आरोपी सध्या कारागृहात आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना (Adv. Vijay Raut) अॅड. विजय राऊत यांनी पप्पू चव्हाण यांच्यावर झालेला हल्ला योग्यच होता. इंदोरिया यांच्यावर खूप अन्याय झाला, त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही, इंदोरिया याने पप्पू चव्हाणचा मार खाऊन जीव द्यायचा होता का, व तो अराजकता माजवत आहे असे जाहीरपणे प्रसार माध्यमाद्वारे इंदोरिया याचे समर्थन करून न्यायालयाचा अवमान केला.
तसेच पप्पू चव्हाण हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर २० ते २२ गुन्हे दाखल आहेत यासह इतर संदर्भात राऊत यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर युट्युब लिंक टाकून पप्पू चव्हाण यांची प्रसार माध्यमाद्वारे बदनामी केल्याने २५ सप्टेंबरला पप्पू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Adv. Vijay Raut) अॅड. विजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.