परभणी/जिंतूर(Parbhani) :- बँकेत असलेल्या खात्यात २५ लाखाची रोकड भरण्यासाठी आलेल्या खातेदाराजवळील १ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बारा ते पावणे एक या दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) शाखा जिंतूर येथे घडली. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील घटना अज्ञात चोरट्यावर गुन्हा
विश्वेश किर्तनकार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे इतर एका सोबत २५ लाखाची रोकड घेऊन बँकेच्या खात्यावर भरण्यासाठी आले होते. बँकेत (Bank)गर्दी असल्याने रोकडची बॅग घेऊन ते रांगेत उभे टाकले. कॅश काउंटरवर गेल्यावर त्यांनी रोकड काढली असता एक लाख रुपये कमी दिसले. रांगेत उभे असताना पाठीमागे असणार्या इसमाने फिर्यादीच्या बॅगेतून लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याचे समजले. सदर प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर पोलीस अधिक तपास करत आहेत.