कारंजा(Washim):- एका 40 वर्षीय मजुराचा आकस्मिक मृत्यू (sudden death) झाला. ही घटना 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. कैलास साधू माळी वय 40 वर्ष असे मृतक मजुराचे नाव असून, ते धुळे जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही
सूत्रांच्या माहितीनुसार, मृतक कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागात एका डाळिंबाच्या बागेत मजूर (laborer) म्हणून काम करीत असताना दोन दिवसापूर्वी त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर खासगी दवाखान्यात(clinics) त्याने उपचार घेतले. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्याच्या सोबतचे काही जण त्याला मूळ गावी घेऊन जाण्याकरिता कारंजा बस स्थानकात(bus station) आले असता, त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित(declared dead) केले. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. दरम्यान, शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.