दलाल सक्रिय, परराज्यातील कत्तलखान्यात रात्रोरात पोहोचवली जातात जनावरे
कोरची (Cattle smuggling) : कोरची तालुका मुख्यालयापासून १० कि.मी अंतरावर बोरी, हितापाडी ,बोटेकसा ,जंगल परिसरात मागील अनेक वर्षापासून गोवंश तस्करी जोमाने सुरू आहे. या परिसरातील काही गांवे गोवंश तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहेत. शेजारच्या जिल्ह्यातील दलाल या भागात सक्रिय झाले असून येथून लगतच्या जिल्ह्यासह थेट आंध्र प्रदेश ,तेलंगाना ,नागपूर ,हैदराबाद ईत्यादी ठिकाणी जनावरे कत्तलीसाठी पाठविले जात आहेत. गोवंश तस्करानी या परिषरात आपले नेटवके़ वाढविले असल्याने या भागातील जनावरे (Cattle smuggling) नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरची तसेच धानोरा , गोदिंया जिल्यातील देवरी तालुक्यातील मिसपीरी ,कोरची तालुक्यातील असलेल्या बोरी, बोटेकसा, हितापाडी,मिसपीरी, जारावंडी , पेंढरी परिसरात आदिवासीबहुल असून याचा गैरफायदा गोतस्कर घेताना दिसून येत आहेत. शेती व्यवसायात यांत्रिक उपकरणाचा वापर वाढला असला तरी पण बोरी, व हितापाळी, बोटेकसा, जारवंडी, परिसरात बहुतेक शेतकरी बैल ,रेडा यांच्या सहाय्याने शेती करतात .त्यामुळे पशुधनाचे महत्त्व आजही कायम आहे. या परिसरात जनावराचा विशेष सांभाळ पशुपालन (Cattle smuggling) करीत असल्याने या भागात जनावरांची संख्या लक्षणीय आहे. नेमकी हीच बाब हेरून बोरी ,हितापाडी परिसरात तस्करींचा अड्डा तयार केला आहे.
कोरची तालुक्यात गो तस्करांचा आवाज बुलंद !
गो तस्कर करणे, ट्रकमध्ये कोंबुन घेऊन जाणे ईत्यादी कृत्ये करण्यास कायद्याने बंदी आहे. तरीही असे कृत्ये करणारा (Cattle smuggling) बिनदिक्कतपणे करीत असेल, तर कुंपणच कुरण खाते असेच बोलल्या जात आहे. विशेष म्हणजे कोरची पासून तब्बल ५ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र ओलांडून गो तस्कर थेट हैद्राबाद पर्यंत जनावरांची तस्करी करीत असल्याने यामध्ये मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलल्या जात आहे.




