गोंडपिपरी (Gadchiroli):- गोंडपिपरी तालुक्याला तेलंगनाची सीमा.तालुक्यातील मार्गाने गोवंशाची तस्करी केली जाते. गोंडपिपरी पोलिसांनी गोवंशाची तस्करी करणार्या विरोधात मोहीम उघडली असून कार्यवाहीचा सपाटा सुरु आहे. दि.२८ ऑगस्ट २०२४ रोजी बुधवार, भंगाराम तळोधी येथे ३२ गोवंश असलेला ट्रक पोलिसांनी पकडला.त्यातील तीन जनावरे मृत (Death)आढळून आली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. सतत होणार्या कारवाईमुळे गोवंशाची तस्करी करणार्यांचे धाबे दणानले आहेत.
आरोपीला अटक तेरा लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली ते पोळसा मार्गे गोवंश असलेला ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आणि त्यांचा सहकार्यानी भंगाराम तळोधी येथे नाकाबंदी (Blockade)केली. या मार्गाने आलेला ट्रक क्रमांक के.ए.-५६-३८९५ ) पोलिसांना संशयास्पद वाटला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये ३२ गोवंश जनावरे आढळून आलीत. त्यात तीन जनावरे मृत होती. मध्य प्रदेशातील सद्दाम खान, वसीम खान (गडचांदूर), अरबाज कुरेशी (Nagpur) या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तेरा लाख विस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत यांचा मार्गदर्शनात ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पो.उप निरीक्षक मंगेश कराडे, पोलीस अंमलदार प्रशांत नेताम, तिरुपती गोंडसेलवर यांनी केली आहे.