चिखली (Buldhana) :- अवैध रेती वाहतूक(Illegal sand transport) प्रकरणातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळू माफियांसाठी कर्दनकाळ ठरू लागलेले ठाणेदार विकास पाटील हे ॲक्शन मोडवर येवून सात अवैध रेतीचे भरलेले टिप्पर (Tipper) पाठलाग करीत पकडले. आणि प्रत्येकी २० हजार ६०० रुपये असा एकूण एकूण १४ लाख १२ हजार रुपयाचा दंड भरण्याच्या नोटिसा तहसीलदारा मार्फत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाळू माफियामध्ये मोठी धावपळ उडाली आहे.
अंढेरा पोलीस ॲक्शन मोडवर
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा नदी पात्रातून वाळू माफिया (Sand Mafia) हे कोणालाही न घाबरता मोठया प्रमाणावर अवैध वाळूची वाहतूक करतात. या प्रकरणी १५ ते २० वाळू माफियावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने एमपीडीए. ऍक्ट अन्वये एका वाळू वर्षासाठी अकोला तर दुसऱ्याला येरवडा कारागृहात(Yerwada Jail) रवानगी करण्यात थाबण्यात आले. तरी सुध्दा वाळू माफियांनी अवैध रेतीची वाहतूक बंद केली नाही आणि राजरोसपणे अवैध वाहतूक करू लागले. हा प्रकार पाहून तहसिलदार व ठाणेदार यांनी गुपित माहिती घेवून एका पाठोपाठ सात अवैध रेतीचे टिप्पर पाठलाग करीत पकडले. त्यामध्ये उध्दव भगवान जेठे यांच्या टिप्पर मध्ये अवैध रेती ४ ब्रास किंमत २० हजार ६०० रुपये , गणेश मधुकर घोटे यांच्या ४ ब्रास रेती किंमत २० हजार ६०० रुपये , ज्ञानेश्र्वर अंबादास घुबे यांच्या टिप्पर मध्ये ४ ब्रास रेती किंमत २० हजार ६०० रुपये ,कैलास सखाराम पडघन यांच्या टिप्पर मध्ये ४ ब्रास रेती २० हजार ६०० रुपये ,रामेश्वर सोळंकी यांच्या ४ ब्रास रेती २० हजार ६०० रुपये असे एकूण पाच अवैध रेती टिप्पर वर १४ लाख १२ हजार रुपये दंड ठोकण्यात येणार आहे.
या बाबत दंडाच्या नोटीसा तहसिलदार संतोष काकडे यांच्या कडून देण्यात आल्या असल्या तरी राहलेले दोन टिप्पर खाली असल्याने पोलीस व महसूल प्रशासन काय कार्यवाही करेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे .