प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे यांनी तन्मयचा सत्कार केला.(Prabhat Director Dr. Gajanan slogans)
अकोला (Akola) : _ सीबीएसई बोर्डाचा (CBSE Board) इयत्ता दहावी आणि बारावीचा बहुप्रतीक्षित निकाल सोमवारी घोषित झाला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर केला असून गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, (Sri Samarth Public School and Junior College) रिधोरा शाळेच्या उत्तीर्णतेची टक्केवारी १०० टक्के असून सर्वच विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे. समर्थच्या गुणवंत विद्यार्थ्यांनी शाळेच्या लौकिकात भर टाकली असून शाळेच्या निकालाची टक्केवारी शतप्रतिशत असल्याने श्री समर्थ स्कूल अकोल्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा दर्जा अधोरेखीत करणारी ठरली आहे. समर्थ पब्लिक स्कूल ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असते. यावर्षीचा दहावी व बारावीचा उत्कृष्ठ निकालाने ही परंपरा अबाधित ठेवली आहे.
सीबीएसई परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता दहावीतून स्वराज तायडे ९५.८० टक्के,
सिमरण चोरे ९५.०६, मंदार जोशी ९५.०२ टक्के, श्रेयश वाकले ९४.०६ टक्के, सृष्टी निखारे ९३.०८ टक्के, समृध्दी बघेल ९३.०२ टक्के, क्षितीज वाघ ९२.०८टक्के, पार्थ टाले ९२.०२ टक्के, यश राठोड ९०.०८ टक्के, गौरी जोशी ९०.०६ टक्के, पायल ढेंगे ८९.०६ टक्के, तेजस ठाकरे ८७.०८ टक्के, अर्णव बालिंगे ८७.०४ टक्के, अथर्व महल्ले ८५.०८टक्के, गौरी दांदळे ८५.०८ टक्के विद्यार्थी अनुक्रमे गुणवंत ठरले आहेत.
■ सीबीएसई बोर्ड दहावी-बारावीचा उत्कृष्ट निकाल
■ पब्लिक स्कूलसह कनिष्ठ विद्यालयाचे यश
■ ‘समर्थ’ची १०० टक्के निकालाची परंपरा कायम
तसेच सीबीएसई बारावीमध्येही अरिबा अश्रर, हर्ष त्रिपाठी, प्रथमेश तांदळे, संस्कृती टोले या विद्यार्थ्यांनी यशस्वी झेप घेत शाळेचे नाव उंचावले आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीन बाठे, संचालिका प्रा. जयश्री बाठे, संचालक प्रा. राजेश बाठे, प्रा. किशोर कोरपे, प्रा. योगेश जोशी, प्रा. किशोर रत्नपारखी, प्रा.डॉ. .जी.सी. राव, सुवर्णा सुवर्णा गुप्ता, प्राचार्या अश्विनी थानवी यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे.
अशीच परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे प्राचार्या अश्विनी थानवी यांनी
देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
दहावीची परंपरा कायमगुणवंत विद्यार्थ्यांनी शाळेच्या लौकिकात भर श्री समर्थ पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के (Shree Samarth Public School 10th Result 100 percent) लागला असून कनिष्ठ महाविद्यालय, रिधोराचाही निकाल उत्कृष्ट लागला आहे. सलग चार वर्षांपासून सीबीएससी बोर्ड परीक्षेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. श्री समर्थ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे (Director Prof. Nitin Bathe) यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रमातून यश मिळविले आहे.