नवी दिल्ली (CBSE Result 2024) : : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 12वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बारावीच्या परीक्षेत 87.98 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. यावेळीही मुलींनीच बाजी मारली आहे. इयत्ता 12वीचे विद्यार्थी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल त्वरित पाहू शकतात. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.52 इतकी आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे. मुलांपेक्षा 6.40 टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. देशभरात त्रिवेंद्रम आघाडीवर आहे. येथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.91 आहे. दिल्ली पश्चिमची (CBSE Result) उत्तीर्णतेची टक्केवारी 95.64 टक्के आहे. दिल्ली पूर्वची टक्केवारी 94.51 टक्के होती.
देशभरात त्रिवेंद्रम आघाडीवर
सीबीएसई बोर्डाच्या (CBSE result) 12वीत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 91.52 इतकी आहे. तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 85.12 टक्के आहे. मुलांपेक्षा 6.40 टक्के जास्त मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. देशभरात त्रिवेंद्रम आघाडीवर आहे. येथील उत्तीर्णतेची टक्केवारी 99.91 आहे. दिल्ली पश्चिमची उत्तीर्णतेची टक्केवारी 95.64 टक्के आहे.
CBSE Result 2024: निकाल कसे तपासायचे?
-विद्यार्थी खालील चरणांचे अनुसरण करून त्यांचे निकाल तपासता येणार आहे.
-सर्व प्रथम विद्यार्थी अधिकृत वेबसाइट (cbseresults.nic.in.) वर जा.
-CBSE निकाल 2024′ या लिंकवर क्लिक करा.
-आता (CBSE result) विद्यार्थ्याचा रोल नंबर, शाळा क्रमांक आणि प्रवेशपत्र आयडी टाका.
-सबमिट बटणावर क्लिक करा.
-CBSE इयत्ता 10वी/12वीचा निकाल 2024 स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
-आता निकाल डाउनलोड करा.