रिसोड (CBSE Result) : स्व. माणिक पोदार लर्न स्कूलच्या (Podar School) माध्यमातून मागील काही वर्षापासून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळेचे माध्यमातून विद्यार्थी केंद्रित शिक्षण देण्याचे कार्य होत आहे. म्हणूनच अगदी कमी वर्षांमध्ये शाळेने आपल्या नावाची उंची गाठलेली आहे. तसेच ग्रामीण भागातील (CBSE result) विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण या शाळेच्या माध्यमातून मिळत आहे. स्वर्गीय माणिक (Podar School) पोदार स्कूल दर्जेदार शिक्षणाबरोबरच आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच समाजामध्ये राहण्यासाठी आवश्यक गोष्टी. नीती मूल्ये आत्मसात करण्यासाठी शाळा नेहमीच अग्रेसर आहे. म्हणूनच अगदी कमी वर्षांमध्ये शाळेने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे. व आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून आदर्श विद्यार्थी घडवत आहे. तसेच रिसोड व सेनगाव सारख्या भागात शैक्षणिक क्षेत्रामध्ये नव संजीवनीचे काम करत आहे. स्व. माणिक पोदार लर्न स्कूल चा (Podar School) सलग तिसऱ्या वर्षीही CBSE बोर्डाचा 100% निकाल लागला आहे. CBSE result शाळेची विद्यार्थिनी रिधिमा देशमुख ही जिल्ह्यातून प्रथम येऊन पालकांचे व शाळेचे नाव उंचावले आहे.
यावेळी शाळेतील वर्ग 10 वी ला एकूण 33 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 9 विद्यार्थी 90% च्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झाले आले. त्यामध्ये रिधिमा देशमुख, ऋतुजा महाजन,श्वेता बुजारे,सुजल देशमुख,स्वयम पाटील आणि 80% च्या वर 9 विद्यार्थी आहेत. इतरही विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. अगदी कमी कालावधी मध्ये शाळेने उंच भरारी घेऊन वाशीम जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. याची परिसरात व पालकांमध्ये चर्चा होत आहे. त्यामधून सर्व विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन हे यश संपादक केले आहे. (Podar School) विद्यार्थ्यांनी याचे श्रेय शिक्षक, शाळा, पालक यांना दिले. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांचे नेत्रदिपक यश पाहून शाळेचे अध्यक्ष विनायक जाधव, सीमा मापारी, प्राचार्य बस्वराज जगाये, नर्गिस अंजुम, पवन जाधव तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांना शुभेच्छा दिल्यात..