पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मैदानाची केली पाहणी
हिंगोली (Hingoli Dussehra festival) : येथील एैतिहासीक सार्वजनिक दसरा महोत्सव (Dussehra festival) सर्वदुर प्रसिद्ध आहे. याच दरम्यान (Navratri festival) नवरात्र महोत्सवही मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक दिवशी नागरिकांची मोठी गर्दी असते. रामलिला मैदानावर गर्दीवर वॉच करण्याकरीता ३० सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविले जाणार असून, कृषी प्रदर्शनीच्या चारही बाजूला वॉच टावर व टेहाळणीसाठी पोलिसांचे पथक नियुक्त केले जाणार आहेत.
१५ सप्टेंबरला सार्वजनिक दसरा महोत्सवाचे (Dussehra festival) बासा पूजन झाले. २ ते १३ ऑक्टोंबर दरम्यान दसरा महोत्सवात अनेक स्पर्धा, शंकरपट, कुस्त्या घेण्यात येणार आहेत. २ ऑक्टोंबरला जि.प. प्रशाला मैदानावर दुपारी ४ वाजता क्रिकेट स्पर्ध याच दिवशी सायंकाळी ७ वाजता जलेश्वर मंदिरात आकाशवाणी, ३ ऑक्टोंबरला रामलिला मैदानावरून हनुमानाच्या मुर्तीची मिरवणूक काढली जाणार, रात्री ८ वाजता दसरा महोत्सवाच्या औद्योगिक व कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार, ४ ऑक्टोंबरला बद्रीनारायण मंदिरात दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म, ५ ऑक्टोंबरला सकाळी ९ वाजता लिंबाळा मक्ता एमआयडीसी भागात बॅडमिंटन स्पर्धा, सकाळी ११ वाजता कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात महिलासाठी होममिनीस्टर स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता रामलिला मैदानावर हभप प्रकाश म. साठे यांचे कीर्तन होणार आहे.
६ ऑक्टोंबरला लिंबाळा मक्ता एमआयडीसी भागात सकाळी ९ वाजता बॅडमिंटन स्पर्धा, सकाळी ९.३० वाजता जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात कराटे स्पर्धा, दुपार २ वाजता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला व्हॉलीबॉल स्पर्धा, सायंकाळी ६ वाजता गणेशवाडी हिरो शोरूमच्या बाजूला लॉन टेनिस स्पर्धेचा शुभारंभ, ७ ऑक्टोंबरला रामलिला मैदानावर सायंकाळी ५ ते ८ दरम्यान करा ओके हिंदी व मराठी सदाबहार गितांचा कार्यक्रम, सकाळी ७.३० वाजता जि.प. प्रशाला मैदानावर नाटक स्पर्धा, दुपारी ४ वाजता फुटबॉल स्पर्धा, ९ ऑक्टोंबरला लिंबाळा मक्त एमआयडीसी भागात सकाळी ८ वाजता सायकलींग स्पर्धा, सकाळी ११ वाजता जि.प.प्रशाला मैदानावर शंकर पट, १० ऑक्टोंबरला रामलिला मैदानावर कुस्त्यांची दंगल, ११ ऑक्टोंबरला पोलिस कवायत मैदानावर दुपारी १२ वाजता कबड्डी स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता रामलिला मैदानावर स्वर गांधार ऑकेस्ट्रा, १२ ऑक्टोंबर रात्री १०.४१ वाजता रावन दहन तर १३ ऑक्टोंबरला दुपारी ४ वाजता भरत भेट व (Dussehra festival) रामलिला मैदानापासून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
दसरा महोत्सवात (Dussehra festival) प्रत्येक दिवशी महिलांची मोठी गर्दी असते. कुठेही छेडछाडीच्या घटना अथवा दागिने चोरीच्या घटना घडू नये. या दृष्टीने (CCTV camera) सीसीटीव्ही कॅमेर्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त व चिडीमार पथक तैनात केले जाणार आहे. या दृष्टीकोणातून ३० सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी प्रत्यक्ष मैदान स्थळाची पाहणी करून काही मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, मधुकर खंडागळे, आमेर अली आदींची उपस्थिती होती. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार, यासोबतच साध्या वेशात व (Hingoli Police) पोलिसांचे चिडीमार पथकही मैदानावर तैनात केले जाणार आहे.