नागपूर (Cement factory Explosion) : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावात आज पहाटे तीन वाजता (Cement factory Explosion) एका कारखान्यात स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. श्री जी ब्लॉक नावाची खाजगी कंपनी (Shree G Block company) मोठ्या प्रमाणात सिमेंट बीट्स बनवते. त्याच्या कारखान्यात अचानक स्फोट झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला असून, अन्य सहा मजूर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी (Nagpur Hospital) नागपूरला नेण्यात आले आहे. नंदकिशोर कारंडे असे मृताचे नाव आहे. हा स्फोट इतका जोरदार होता की संपूर्ण कारखाना उद्ध्वस्त झाला.
महाराष्ट्रातील नागपूर येथील सिमेंट कारखान्यात (Cement factory Explosion) भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा जण जखमी झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील झुल्लर गावात पहाटे 3 वाजता एका कारखान्यात स्फोट झाला. जखमींना तात्काळ (Nagpur Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. (Nagpur Explosion) स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. श्री जी ब्लॉक कंपनीकडून मृतकाच्या कुटुंबियांना 30 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे.