कारंजा/ वाशिम (Central Agriculture) : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय नवी दिल्लीमार्फत उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे (PM Narendra Modi) पंततप्रध़ान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 18 जून रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कारंजा तालुक्यातील (Agriculture) कृषी सखी किरण वानखडे व रूपाली पाडर यांचा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहाण (Shivraj Singh Chauhan)यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कृषीसखी वानखडे व पाडर यांनी केले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
या कार्यक्रमात (Agriculture) कृषी सखी किरण वानखडे व रूपाली पाडर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे व प्रकल्प संचालक किरण कोलते यांच्या मार्गदर्शनात त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कॄषीमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक शेती व ग्रामीण भागात जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या उपजिविका निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला.
नैसर्गिक व जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या कार्याची दखल
यावेळी पंततप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व कॄषीमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रभारी समन्वयक नरेंद्र उभआलकर , प्रगतीशील शेतकरी रितेश पाडर उपस्थित होते. त्यांना जिल्हा व्यवस्थापक खुजे , तालुका व्यवस्थापक वर्षा ठाकरे आणि प्रकल्प संचालक कोवे यांचे मार्गदर्शन लाभले. (Agriculture) कृषीसखी किरण वानखडे या कारंजा तालुक्यातील बांबर्डा येथील तर रूपाली पाडर या वापटी येथील रहिवासी आहेत.