रिसोड(Washim):- देशातील सर्वात मोठी अभियांत्रिकी प्रवेश (Engineering Admission) परीक्षा देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना जेईई(JEE), मुख्यपरीक्षा 2025 च्या परीक्षा प्रवेश दाखल करण्याच्या सुचना 30 ऑक्टोबर रोजी जाहीर झाली यामध्ये जेईई परीक्षा अर्ज दाखल करण्याची 22 नोव्हेंबर 2024 आसल्याने ऐन निवडणुकीत च्या रणधुमाळीत पालक, विद्यार्थ्यांना संबंधित प्रमाणित दाखल्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल दाखला काढणे कठीण
देशातील सर्वात महत्वाची अभियांत्रिकी परीक्षा म्हणुन जेईई परीक्षेकडे पाहील्या जाते,सदर परीक्षा ही के॔द्र घेत आसल्याने यापूर्वी परीक्षार्थी संबंधित परीक्षेसाठी आर्थिक दुर्बल घटकातील आहेत का या साठी आधी फक्त हो किंवा नाही ऐवढेच विद्यार्थ्यांना अर्ज करतांनी टाकावे लागत होते.परंतु संबंधित परीक्षा घेणा-या एजेंसिने ता. 30 ऑक्टोबर रोजी आपल्या ऑनलाईन साईटवर (Online Site) परिक्षार्थ्यानी सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे,परंतु हल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आसल्याने जेईई परीक्षे साठी आवश्यक प्रमाण पत्रासाठी स्थानिक ठिकाणा पासुन ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पालक, परिक्षार्थ्याना चकरा मारव्या लागतात कारण प्रत्येक विद्यार्थ्याने काढलेल्या आधीच्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रमाणपत्र प्रमाणित करणा-या अधिकारी यांचे नाव आवश्यक आहे. जे की आधी समाविष्ट नव्हते. त्यामुळे आधी काढलेले ओबिसी, ईडब्ल्युएस (EWS) च्या विद्यार्थ्यांना नव्याने आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र ता.22 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे, अर्ज भरण्याला अवघे 20 दिवस राहील्याने आणि ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आसल्याने पालकांसाठी तारेवरची कसरत ठरत आसल्याचे पालक वर्गातुन बोलल्या जात आहे.