मानोरा(Washim):- केंद्रीय अर्थमंत्री (Union Finance Minister) निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए (NDA)सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांवर निधीची उधळण करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आले. याबद्दल पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) व प्रांत अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशनुसार दि. २५ जुलै रोजी जिल्हा ठिकाणी आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस(Nationalist Congress) शरद पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर निषेध नोंदवून आंदोलन केले.
अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष अशा घोषणा देत यावेळी सरकारचा निषेध
केंद्र सरकारला(Central Govt) महाराष्ट्रातून जास्त प्रमाणात टॅक्स मिळत असूनही अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राला दुर्लक्ष केले आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आले. केंद्र सरकार हे महाराष्ट्र द्वेषी व विरोधी असल्याचे या अर्थसंकल्पाने सिद्ध केले आहे. अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष, महाराष्ट्र रोष अशा घोषणा देत यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी आ.अनंतकुमार पाटिल, जिल्हाध्यक्ष बाबाराव खडसे, बाबुसिंग नाईक, अरविंद इंगोले पाटील, डॉ.श्याम जाधव(नाईक), भोजराज चव्हाण, श्रीधर पाटील कानकीरड, डॉ.भगवंतराव गोटे, अनंत काळे, वैशाली मेश्राम, इम्रान फकिरावाले, महादेव अंभोरे, कैलास खानझोडे, ज्योतीताई गणेशपुरे , राजेश टोपले, सुनील पाटील, राजू अवताडे, डॉ. अशोक मुंदे, सुमित पाटील, रमेश जाधव, गजानन पाटील, मनोज कानकीरड, काशीराम राठोड, दिलीप पाटील रोकडे, नरेंद्र डाखोरे आदी उपस्थित होते.