बुलढाणा (Buldhana):- संघ परिवाराशी संबंधित असलेले चैनसुख मदनलाल संचेती, यांना मलकापूर विधानसभा मतदारसंघातून (Assembly constituencies) भारतीय जनता पार्टीने तब्बल सहाव्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. तर सुरुवातीची निवडणूक ते अपक्ष म्हणून लढले आहेत. विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची त्यांची ही सातवी वेळ असून, सहा वेळा ते विजयी झाले तर एक वेळा पराभूत झाले !
सहा वेळा ते विजयी झाले तर एक वेळा पराभूत झाले !
चैनसुख मदनलाल संचेती, यांनी 1995 ला भाजपा (BJP)विरोधात संघनिष्ठांचा मेळावा बुलढाण्यात घेऊन मलकापूर मधून अपक्ष निवडणूक लढवली होती.. त्यावेळी ते विजयी झाले. 1995 ला सर्वाधिक अपक्ष निवडून आले होते त्यात चैनसुख संचेती होते, निवडून येताच त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी अपक्षांच्या भरवशावर शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले होते. त्यावेळी बुलढाणा जिल्ह्यातून दोन अपक्ष निवडून आले होते, सि. राजातून अपक्ष म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे निवडणूक जिंकले होते. विशेष म्हणजे चैनसुख संचेती व डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ती पहिलीच निवडणूक होती. पुढे भाजपाने संचेती यांचा पक्षात तात्काळ समावेश करून घेऊन 1999 ची उमेदवारी संचेती यांना दिली. 2004, 2009, 2014, 2019 व आता 2024 अशी तब्बल सहा वेळा भाजपाने संचेती यांना उमेदवारी दिली आहे.
2019 ला चैनसुख संचेती काँग्रेस उमेदवार राजेश एकडे यांच्याकडून पराभूत झाले होते. आता त्यांनीच पक्षात घेतलेले शिवचंद्र म्हणजे तायडे हे त्यांच्या किंवा त्यांच्या सुविध्य पत्नी उमाताई तायडे यांच्यासाठी प्रयत्नशील होते, मध्येच लखानी यांचेही नाव आले होते. तर संचेती हे सत्तरीच्या पुढे गेल्यामुळे त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला संधी देण्याचीही मागणी होत होती. पण भाजपा दरबारी संचेती यांचे वजन जास्त ठरले, व शेवटी त्यांनाच मलकापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी लागली.. यावेळी पुन्हा त्यांची लढत काँग्रेस उमेदवार राजेश एकडे यांच्यासोबत होणार आहे !