शेतकर्यांनी केले मोहिमेचे स्वागत
कुनघाडा रै (Farmers debt relief) : किसान ब्रिगेडच्या (Kisan Brigade) वतीने शेतकरी नेते दैनिक देशोन्नतीचे एडिटर – ईन – चिफ प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा आवृत्ती प्रमुख प्रा. अनिल धामोडे यांच्या नियोजनबध्द कार्यक्रमानुसार शेतकरी कर्जमुक्तीची मोहीम सुरू करण्यात आली असून, दै देशोन्नतीचे कुनघाडा रै. प्रतिनिधी पुंडलिक भांडेकर यांच्या नेतृत्वात चाकलपेठचे (Farmers debt relief) शेतकरी प्रतिनिधी, नामदेव किनेकर, लखमापुरचे प्रतिनिधी दिलखुष बोदलकर, देशोन्नतीचे घोट प्रतिनिधी हेमंत उपाध्ये , घोटचे माजी सरपंच अशोक पोरेड्डीवार ,भाऊराव कुमरे, नवतळा तुकुमचे प्रतिनिधी दिलखुश कुनघाडकर, मुरखळाचे प्रतिनिधी देवेंद्र सोमनकर, लखामापूर बोरीचे माजी सरपंच तामदेव सातपुते, येनापुरचे प्रतिनिधी कमल मंडल, कालिदास पाल , घारगावचे प्रतिनिधी प्रफुल लाटकर यांच्या विशेष सहकार्याने चामोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन कर्जमुक्तीचे अर्ज तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे शेतकर्यांची (Farmers debt relief) संख्या शेकडोच्यावर असल्याने तहसीलदार यांनी गेटच्या बाहेर येऊन अर्ज स्वीकारले. (Kisan Brigade) किसान ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात येणार्या कर्जमुक्ती मोहिमेचे शेतकर्यांनी स्वागत केले. अर्ज सादर करताना चामोर्शी, कुनघाडा रै, पावीमुरांडा, गिलगाव, जोगना, तवतळा, मुरमूरी, लखामापुर बोरी, चाकलपेठ, कुंभारवाई, दुर्गापुर, चित्तरंजनपुर, येनापुर, मालेर माल, मालेर चक, घारगाव, उमरेट, भिक्षी, सोनापुर, कुथेगाव, वरुर, कुरुड, हिवरगाव, घोट, इरई, पेठतळा, कर्दुळ, क्रीष्टापुर, नवेगाव माल, सोमणपल्ली, भोगणबोडी, गौरीपुर, रामसागर आदी गावातील जवळपास १६० शेतकरी उपस्थित होते.
कर्जमुक्ती अर्जाचा तिसरा टप्पा सुरू करावा : शेतकर्यांची मागणी
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुका लोकसंख्येने व विस्ताराने बराच मोठा असून, (Farmers debt relief) शेतकर्यांची संख्या लक्षणीय आहे. सदर तालुका धान उत्पादनाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. सतत येणार्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती तोट्यात येत असली तरी तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन शेती करीत आहेत. (Kisan Brigade) किसान ब्रिगेडच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती मोहीम सुरू करण्यात आली असून, पहिला व दुसरा टप्पा पार पडला आहे. चामोर्शी तालुक्यात अनेक शेतकर्यांनी कर्ज घेतले आहेत. कर्जमुक्तीची मोहीम परिपूर्ण यशस्वी करण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करावा अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
