चाणक्य नीती (Chanakya Niti) : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक महान भारतीय विद्वान आहेत, ज्यांनी ‘चाणक्य नीति’ सारखा मोठा ग्रंथ लिहिला आहे. असे मानले जाते की, चाणक्य ही अशी व्यक्ती होती ज्याला राजकारण, अर्थशास्त्र, वैद्यक, युद्ध आणि रणनीती (Strategy) या विषयांचे ज्ञान होते. या सर्व विषयांचा त्यांनी त्यांच्या निती शास्त्रातही उल्लेख केला आहे, ज्याचा अभ्यास माणसाला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देतो.
असे म्हटले जाते की, चाणक्य नीतीमध्ये जीवन, संपत्ती, योग आणि नातेसंबंध सांगितले आहेत. तर आचार्य चाणक्य यांनी मैत्रीची (Friendship) व्याख्या देखील केली आहे. चाणक्य नीतीनुसार, मैत्री हे आपल्या सर्वांच्या जीवनातील एक अनोखे नाते आहे. जे एखाद्या व्यक्तीला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते. मैत्रीमुळे व्यक्तीचे सामाजिक संबंधही सुधारतात. परंतु काही लोकांशी मैत्री करू नये, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
परोक्षे कार्यहंतरम प्रत्यक्षे प्रियवदिनम् ।
वर्जयेत्तदृष्म मित्रं विषकुम्भ पयोमुखम् ।
आयुष्यात कोणाशीही मैत्री करताना आचार्य चाणक्य यांचा हा श्लोक (Verse) नेहमी लक्षात ठेवावा. या श्लोकाचा अर्थ असा आहे की, आपण आयुष्यात अशा लोकांशी मैत्री करू नये, जे तोंडावर गोड असतात पण पाठीमागे काम बिघडवतात. आचार्य चाणक्यांच्या मते, अशा लोकांना नेहमी तोंडावर दूध असले तरी, आत विष भरलेल्या घागरीप्रमाणे टाकून द्यावे.
न विश्वसेत कुमित्रे च मित्र चापि न विश्वसेत ।
कदाचित दुष्ट मित्र सर्व रहस्ये उघड करतात ।
या श्लोकाचा अर्थ असा आहे की, आपण सर्वांनी खोट्या मित्रावर विश्वास ठेवू नये. चाणक्यांच्या मते, खोटे लोक भांडणाच्या वेळी तुमची सर्व रहस्ये इतरांसमोर उघड करू शकतात. ज्यामुळे तणाव, दुःख आणि समस्या वाढू शकतात. त्यामुळे अशा लोकांशी चुकूनही मैत्री करू नये.
मूर्ख लोकांपासून दूर रहा
आचार्य चाणक्य यांच्या मते, मूर्ख लोकांशी कधीही मैत्री करू नये, जर अशा लोकांशी मैत्री असेल; तर ती व्यक्ती नेहमी संकटांनी घेरलेली असते. चाणक्याच्या मते, आपल्या जीवनावर (Life) सहवासाचा जास्त प्रभाव असतो, म्हणून मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू चांगला असतो.
अहंकारी लोकांशी मैत्री करू नका
आयुष्यात कधीही अहंकारी (Arrogance) लोकांशी मैत्री करू नये. हे लोक स्वतःला छान दिसण्यासाठी तुमच्या भावना आणि प्रतिमा खराब करू शकतात, त्यामुळे या लोकांपासून नेहमी अंतर ठेवा.