नवी दिल्ली (Chandipura virus) : देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असून, डासांचे प्रमाणही वाढले आहे. डासांमध्ये आढळणाऱ्या एडिस या विषाणूमुळे लहान मुलांमध्ये चंडीपुरा व्हायरसचा प्रसार होत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) नुसार, देशभरात (Chandipura virus) चंडीपुरा विषाणूमुळे 15 मुलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात चांदीपुरा विषाणूचे 29 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 26 गुजरातमध्ये आणि 2 राजस्थान आणि मध्य प्रदेशात एक आढळले आहेत. त्याला CHPV विषाणू असेही म्हणतात.
आरोग्य विभागाच्या (Health Department) माहितीनुसार, 17 जुलैपर्यंत 15 मृत्यू झाले आहेत, त्यापैकी एक (Chandipura virus) चांडीपुरा विषाणूमुळे झाल्याची पुष्टी झाली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून, हा विषाणू अधिक जिल्ह्यांमध्ये आणि अगदी अहमदाबादसारख्या शहरांमध्ये पसरत आहे. येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चांदीपुरा व्हायरस म्हणजे काय?
चंडीपुरा विषाणू महाराष्ट्रात पहिल्यांदा 1965 मध्ये आढळून आला होता. नागपूरच्या चांदीपूरमध्ये या विषाणूची ओळख पटली, म्हणून त्याला चांदीपुरा व्हायरस असे नाव देण्यात आले आहे. यानंतर 2004 ते 2006 आणि 2019 या काळात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणू (Chandipura virus) आढळून आला आहे. चांदीपुरा विषाणू हा आरएनए विषाणू (Health Department) आहे, जो सामान्यतः मादी फ्लेबोटोमाइन माशीद्वारे पसरतो. डासांमध्ये आढळणारा एडिस हा त्याच्या प्रसारास कारणीभूत ठरतो. त्यामुळे मुलांना या विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक असतो. चंडीपुरा व्हायरसने 15 वर्षांखालील मुले ग्रस्त असतात. आतापर्यंतचा सर्वाधिक मृत्यू या वयातील मुलांमध्ये आढळून आला आहे.
चंडीपुरा विषाणूची लक्षणे
चांदीपुरा विषाणूमुळे (Chandipura virus) ताप येतो, ज्याची लक्षणे फ्लूसारखी असतात. यामुळे तीव्र एन्सेफलायटीस (मेंदूचा दाह) होतो. हा रोगकारक Rhabdoviridae कुटुंबातील vesiculovirus वंशाचा सदस्य आहे. हे डास, टिक्स आणि सॅन्डफ्लाय यांसारख्या वाहकांमुळे पसरते. तीव्र ताप, जुलाब-उलट्या, डोकेदुखी, पेटके, मेंदुज्वर ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. जेव्हा चंडीपुरा विषाणू शरीरात पसरतो, तेव्हा श्वास घेण्यास त्रास होणे, रक्तस्त्राव होण्याची प्रवृत्ती किंवा अशक्तपणा यासारखी इतर लक्षणे देखील दिसतात. अभ्यासानुसार, एन्सेफलायटीस नंतर संसर्ग बऱ्याचदा वेगाने वाढतो, ज्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 24-48 तासांच्या आत मृत्यू होतो.
चंडीपुरा व्हायरस कसा पसरतो?
चांदीपुरा विषाणू डास, टिक्स आणि सँडफ्लाय यांसारख्या वाहकांमुळे पसरतो. फ्लेबोटोमाइन सँडफ्लाय आणि फ्लेबोटोमस पापटासी यासारख्या अनेक सँडफ्लाय प्रजाती आहेत, एडीस इजिप्तीसारख्या डासांच्या काही प्रजाती आहेत, ज्या चंडीपुरा विषाणूचा प्रसार करतात. एडिस इजिप्ती सारख्या काही डासांच्या प्रजाती देखील डेंग्यू पसरवतात.
चांदीपुरा विषाणूचा उपचार काय आहे?
चांदीपुराच्या (Chandipura virus) उपचारासाठी अद्याप कोणतेही अँटी व्हायरल औषध बनलेले नाही. त्याच्या विषाणूवर केवळ लक्षणांच्या आधारे उपचार केले जाऊ शकतात. कारण उपचारासाठी विशिष्ट अँटीरेट्रोव्हायरल थेरपी किंवा लस नाही. मेंदूच्या सूजचे व्यवस्थापन करणे हे मृत्यू टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.