Chandrababu Naidu:- आंध्र प्रदेशात सरकार स्थापनेची तयारी जोरात सुरू झाली आहे. मंगळवारी, टीडीपी चंद्राबाबू नायडू यांची विधिमंडळ पक्षनेता(Legislative Party Leader) म्हणून निवड करू शकते. दरम्यान, जनसेना पक्षाने पक्षप्रमुख पवन कल्याण यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे. पवन कल्याण मंगळवारी सकाळी मंगळागिरी येथील पक्षाच्या मुख्यालयात पोहोचले, तेथे जनसेना पक्षाच्या आमदारांनी त्यांची नेता म्हणून निवड केली.
Andhra Pradesh | The Janasena Legislative Party meeting was held at the party headquarters in Mangalagiri this morning and Pawan Kalyan was elected as the leader of the JanaSena legislative party. pic.twitter.com/R16LwX6HIr
— ANI (@ANI) June 11, 2024
12 जून रोजी आंध्र प्रदेशात(Andhrapradesh) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही(Prime Minister Narendra Modi) शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकतात.