स्टोअर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या
बल्लारपूर (चंद्रपूर) :- बल्लारपूर शहरातील विद्या नगर वॉर्ड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री ११ वाजता उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, विद्या नगर वॉर्ड येथील राहुल विजयकुमार जैस्वाल वय ४४ वर्ष यांनी आपल्या स्वतःचा घरी स्टोअर रूम (Store room) मध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging) केले.
रात्री त्यांचे भाऊ स्टोअर रूम मध्ये गेले असता त्यांना राहुल गळफास घेऊन दिसला. त्यांनी याची माहिती बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह (dead body) शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय (Rural Hospital) येथे पाठविले. पोलीसांनी FIR दाखल केली असून प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय गिन्नलवार, पोहवा विशाल बेझलवार करीत आहेत.