मुल(chandrapur) :- मुल तालुक्यातील मुल पासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हळदी या गावात अंगणातून विद्युत पुरवठ्याचा(Power supply) सर्विस वायर गेल्याने एकमेकात वाद झाला आणि वाद इतका विकोपाला गेला की, वादातून मुख्य आरोपी गुरुदास पिपरे व मुलगा सुरज पिपरे हे दोघे बापलेक मिळून शेजारच्या राजेश शेषराव बोदलकर (३४) याला कुर्हाडीने बोदलकरच्या गळ्यावर वार करुन वाद झालेल्या जागेवरच घटनास्थळी राजेश बोदलकर याची हत्या केली.
जागेवरून वाद; कुर्हाडीने वार करून हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी जागेतून विद्युत कनेक्शन (Electrical connection)लावायचे असल्याने मृतकाच्या जागेमधून सर्व्हिस वायर (Service wire) जात असल्याने त्यांच्यात जागेवरून वाद झाला व वादाचे रूपांतर अखेर कुर्हाडीने(axe) वार करून हत्या करण्यापर्यंत गेल्याची घटना शनिवार दि. ६/७/२०२४ रोजी सकाळी १० वाजता घडली. घडलेल्या घटनेची माहिती गावकर्यांनी तात्काळ पोलिसांना देताच मूल पोलीस हळदी गावात घटनास्थळी त्वरित पोचल्याने मोठा अनर्थ टळला, नाहीतर दोन्ही आरोपींना गावकरी जिवंत राहू दिले नसते, अशी चर्चा गावकर्यात केली जात आहे.
बाप व लेक दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले
मृतकाचे शव शवविच्छेदन (Autopsy) करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असून बाप व लेक दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भगत व पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, यांचे मार्गदर्शनात उपनिरीक्षक मेश्राम करीत आहेत. या घटनेने हळदी गावात व तालुक्यात असेही घडू शकते अशी चर्चा केली जात आहे. मृतक राजेश बोदलकर हा शांत व संयमी स्वभावाचा असल्याचे गावकर्यांनी सांगितले. मृतकास पत्नी, एक मुलगा,मुलगी असा परिवार असल्याचे समजले. तपासाअंती नेमके प्रकरण उजेडात येण्याची शक्यता आहे.