घुग्घुस येथे सुगंधित तंबाखू जप्त
घुग्घुस (Chandrapur) : जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्माका सुदर्शन यांनी जिल्ह्यात अवैध धंदे आणि विशेषत: सुगंधित तंबाखूची (Aromatic tobacco) तस्करी व विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा गुन्हे शाखेचे पोलिस (Police) निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करून कारवाई (Action) मोहीम सुरू केली आहे. ५ मे २०२४ गुन्हे शाखेच्या पथकाला घुग्घुस येथील घरात एक व्यक्ती सुगंधित तंबाखू आणि पान मसाला ठेवत असल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घरावर छापा टाकला असता सुगंधित तंबाखू (Aromatic tobacco) आणि पान मसाला सापडला. ज्यामध्ये २४० गरुड शिशा तंबाखूचे २४० पाऊच २०० ग्रॅम किंमतीचे ७४ हजार ४०० रुपये, होला हुक्का शिशा तंबाखूचे २०० ग्रॅमचे २९ पाऊच किमतीचे ४ हजार ७५६ रुपये, राजश्री पानमसाला गुटखा (Panmasala Gutkha) ३५ पाऊच किमतीचे १४ हजार ४०० रुपये,विमल पानमसाला ३ पाऊच किंमत ३६०,न्न्१ तंबाखूची ९२ किंमत ग्रॅ, २,७७६ रुपये २९ पाउच ब्लॅक लेबल किंमत ८७० रुपये,२० पाउच गोड सुपारी किंमत १२०० रुपये, १२८० रुपये किमतीची १४४ ग्रॅमची सिग्नेचर पान मसाल्याची ४ पाकिटे, एकूण ९५ हजार ७६ रुपये जप्त करण्यात आली आहेत.