चंद्रपूर (Chandrapur):- हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) हे महाराष्ट्राचे वाघ होते. देशाचे कर्तृत्व होते. ते म्हणाले होते की, ज्या दिवशी माझ्या पक्षाला कॉंग्रेस (Congress)सोबत जावे लागेल त्या दिवशी माझे दुकान बंद करेन पण आज दुर्देव हे की, बाळासाहेबांचे सुपूत्र उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेसचे हिंदूत्व स्विकारून बाळासाहेबांचे हिंदूत्व संपविले आहे अश्या शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरेंवर घणाघात
भारतीय जनता पक्षाचा विधानसभा निहाय आढावा घेण्यासाठी ते चंद्रपूर जिल्हयाच्या दौर्यावर आले असता आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूर महानगर अध्यक्ष राहुल पावडे, डॉ. अशोक जीवतोडे, प्रकाश देवतळे उपस्थित होते.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, उध्दव ठाकरे काल नागपुरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या बाबतीत बरळून गेले. ते केवळ नैराश्य आणि वैफल्पग्रस्त झाले आहेत. अशी टिकाही यावेळी बावनकुळे यांनी उध्दव ठाकरेवर (Uddhav Thackeray) केली. १०० कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनिल देशमुख, जमानतीवर आहेत, १५० कोटीच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात सुनील केदार (Sunil Kedar)यांना ५ वर्षाची शिक्षा झाली आहे. अशा लोकांसोबत राहणारे उध्दव ठाकरे भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणविस यांचे बाबत जमानत जप्त करण्याची भाषा बोलत असतील तर उध्दव ठाकरे यांनीच एक तरी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान बावनमुळे यांनी दिले.
उध्दव ठाकरे यांनीच एक तरी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे कधीच निवडणूक लढवून जिंकलेले नाहीत त्यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये बँकडोअर एन्ट्री मिळवून मुख्यमंत्री झाले होते मात्र देवेंद्र फडणविस हे ५ वेळा निवडणुक जिंकलेले नेते आहेत असेही बावनकुळे म्हणाले. दिल्लीत बसून दोन दिवस उध्दव ठाकरे ‘मुख्यमंत्री’ पदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) मागे फिरले पण त्यांना सध्या कुणी विचारत नाही. अशा वैफल्यग्रस्त अवस्थेत ठाकरेंनी अमित शहा यांचेवर टिका केली. उध्दव ठाकरे यांचेकडे नेतृत्व क्षमता कमी असल्याने त्यांचे ५० आमदार सोडून गेले याचा विचार त्यांनी करावा असे सांगत उध्दव ठाकरे कधीच आमदार होणार नाही असा दावा बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.