– जिवतीत चार दिवसापासून बीएसएनएलची सेवा ठप्प
देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर (Chandrapur) : जिवती येथे बीएसएनएलचे ( BSNL ) तालुकास्तरीय कार्यालय आहे. ज्या नेटवर्कनी भारतातील ग्रामीण भागात मोबाईल फोन ( Mobile phone ) आणि इंटरनेट (Internet) वापरण्याची अभूतपूर्व क्रांती केली ती बीएसएनएलची सेवा आता जिवती येथे कोलमडून पडल्याचे पाहायला मिळत आहे. जिवती येथील बीएसएनएलचे कार्यालय फक्त नावापुरते असून महिन्यातील वीस दिवस हे कार्यालय बंदच असते. तालुक्यातील सर्व महत्त्वाची सरकारी कार्यालये (Government offices) म्हणजे पंचायत समिती, तहसील कार्यालय, तालुक्यातील सर्वच बँका, कृषी विभाग, पोलीस स्टेशन अश्या अनेक सर्वच शासकीय कार्यालयांत बीएसएनएलचे नेट आहे. परंतु याने तु जिवती येथील बीएसएनएलच्या या नेहमीच्या ढिसाळ कारभारामुळे बहुतेक सर्व कार्यालयांत नागरिकांना व कर्मचाऱ्यांना सेवे अभावी ताटकळत बसावे लागत आहे. जिवती येथील बीएसएनएल ला रेंज नसण्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्य मोबाईल वापरकर्त्याना आणि तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती, तसेच सर्वच बँका यांना बसत आहे. जे सामान्य नागरिक बीएसएनएलचे नेटवर्क वापरतात त्यांना महिन्यातून फक्त १० ते १५ दिवसच रेंज असते, अश्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेकडो रुपयांचे रिचार्ज जिवतीवासीयांचे वाया जात असून सामान्य माणूसत्यात भरडला जात आहे. तहसिल कार्यालय आणि पंचायत समिती, सर्वच बँकांच्या कार्यालयात (bank offices ) बीएसएनएलची लाइन असल्याने आणि त्यांचे सर्व्हर फक्त बीएसएनएलवर चालत असल्याने अनेक अडचणी येत आहेत. तहसिल कार्यालयात, पंचायत समितीत अनेक नागरिक विविध दाखले व कागदपत्रे मिळवण्यासाठी तालुक्यातील अन्य भागातून मोठ्या प्रमाणात येत असतात परंतु कार्यालयात इंटरनेट नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
– जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे
बीएसएनएलचे कोणत्याही प्रकारचे लक्ष जिवती तालुक्यातील या समस्येकडे नाही. त्यामुळे खासगी नेट कंपन्या यांना जिवती तालुका आंदण दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यावर तत्काळ जिल्हा प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे असून नेट सेवा नसल्याने तहसिल कार्यालयाच्या मार्फत मिळणारा महसूलदेखील बुडत (Revenue is also falling ) आहे आणि सामान्य माणसाचे पैसे वाया जात आहेत.
– नंदाताई मुसने, सामाजिक कार्यकर्त्या तथा ग्रा. प. सदस्या शेणगाव