- तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते.
चंद्रपूर ( Chandrapur ) :- गोंडपिपरी पोलिस व कृषी विभागाची कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक( District Superintendent Police) सुदर्शन मुमक्का, पोलीस उपपविभागीय अधिकारी शिवलाल भगत, विकास पाटील संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण आयुक्तालय, (Control Commissionerate ) जिल्हा कृषी अधीक्षक शंकर तोटावार, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, उपविभाग कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे, ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पंचायत समिती कृषिअधिकरी महेंद्र डाखरे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, श्रावण बोढे, विवेक उमरे, पोहवा देविदास सुरपाम, मनोहर मत्ते, शांताराम पाल, प्रशांत नैताम, पूनेश्वर कुळमेथे यांनी कार्यवाही केली. चोरबीटी बियाणे, युरिया खत व पिकप वाहन असा एकूण ३० लाख ८६ हजार २९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गोंडपिंपरी (Gondpimpri) येथे गोंडपिपरी पोलिसांनी व कृषी विभागाच्या भरारी ( Department of Agriculture ) पथकाने दि. २३ गुरुवारी रात्री बारा वाजता दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील एका आरोपीला २५ लाखाचे चोर बिठी बियाणे वाहतूक करताना जप्त केले.
अनाधिकृत चोर बेटी कापूस बियाण्यास (cotton seed ) शासनाची परवानगी नाही. कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. मात्र गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असल्याने व गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने चोरबीटी बियाणे वाहतूक होत असते. शेतकऱ्यांना चोर बिटि विक्रीकरून फसवणूक केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी कृषी विभाग, ( Agriculture Department, ) पोलीस विभाग ( Police Department ) हे अलर्ट आहेत. ठाणेदार रमेश हत्तीगोटे व पोलिस कर्मचारी गस्तीवर असताना दि. २३ रात्री १२ वाजता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारावर गोंडपिपरी पोलिसांनी आकाश गणेश राऊत (२४) रा. अहेरी, जिल्हा गडचिरोली यांचे गाडी क्र. एम. एच. ३४ एम ८६३५ या वाहनाची तहसिल कार्यालय गोंडपीपरी समोर वाहन थांबवून झडती घेतली असता वाहनात अनधिकृत कापूस बियाणे १२.९० क्विंटल २५.८० लक्ष रुपये किमतीचे बियाणे सापडले. संबंधित बीटी वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.दि. २४ शुक्रवारी पहाटे पाच वाजेपर्यंत चौकशी व कारवाई प्रक्रिया पार पडली.