चंद्रपूर (Chandrapur Flagship Yojana) : राज्य शासनाने तरुण, तरुणी, महिला, वृध्द तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना (Flagship Yojana) सुरू केल्या आहेत. यात मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री मोफत तीर्थदर्शन योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनांचा समावेश आहे. या महत्वाकांक्षी योजनांचा मंत्रालय स्तरावरून नियमित आढावा होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात या योजनांच्या अंमलबजावणीचा (Chandrapur Collector) जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आढावा घेतला.
जिल्हाधिकारी (Chandrapur Collector) कार्यालयात झालेल्या या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) संग्राम शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम आदी हजर होते.