चंद्रपूर (Chandrapur Crime) : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र बँकेसमोर एका २८ वर्षीय तरुणावर अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार (Chandrapur Crime) केला. ज्यात तरुणाचा मृत्यू झाला. कोळसा तस्करीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजुरा येथील कोळसा तस्करीच्या वादातील ही तिसरी हत्या असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहरात मनसे नेत्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती, त्यानंतर बल्लारपूरमध्ये पेट्रोल बॉम्बची घटना उघडकीस आली होती, ही दोन्ही प्रकरणे अद्याप पूर्णपणे शांत झालेली नाहीत, तर आज राजुरा येथील गोळीबाराच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजुरा येथे घडलेल्या या घटनेत शिवज्योतसिंग देवल असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. राजुरा शहरातील गजबजलेला परिसर समजल्या जाणाऱ्या संविधान चौकात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, ज्यात (Chandrapur Crime) हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केला रस्त्याच्या मधोमध त्या तरुणावर गोळी झाडली. त्यावेळी हा तरुण जीव वाचवण्यासाठी एका दुकानात घुसला. मात्र त्याचा जीव वाचवण्यात तो अपयशी ठरला. तोंडाला रुमाल बांधून हल्लेखोर दुचाकीवरून त्याचा पाठलाग करत होते. हे पाहून तो एका दुकानात गेला असता हल्लेखोरांनीही त्याचा पाठलाग करत गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच (Chandrapur Police) पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारवाई सुरू केली.