चंद्रपूर (Chandrapur Crime) : चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात अत्यंत वर्दळीच्या ठिकाण असलेल्या (Chandrapur Crime) रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये आज गुरुवार दि.४ जुलैला दुपारच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर अज्ञात इसमानी गोळीबार (Firing cases) केल्याची घटना घडली. माहितीनुसार, रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांचे जनसंपर्क कार्यालय असून या ठिकाणी अज्ञात आरोपी दबा धरून बसले होते. याच दरम्यान अंदेवार यांच्या वरती अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. अमन अंदेवार याला एक गोळी पाठीला लागल्याची माहिती आहे.
या अगोदर सुद्धा वर्षभराआधी (Chandrapur Crime) रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्येच फिल्मी स्टाईल गोळीबार झाला होता तेव्हा अमन अंदेवार याचा भाऊ आकाश अंदेवार याच्या पाठीला गोळी लागली होती . अमन अंदेवार आणि आकाश अंदेवार हे बहुचर्चित बल्लारपूर येथील सुरज बहुरिया यांच्या हत्येचे आरोपी आहे. त्यामुळे आज झालेल्या (Firing cases) गोळीबार प्रकरणाचे तार बहुरीया हत्याकांडाशी जुळले असावेत, अशी शक्यता आहे. अनदेवार यांचेवर गोळीबार होण्यामागची कारणे काय याचा शोध पोलीस घेत आहेत. आज झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर (Chandrapur Police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज बघून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.