चंद्रपूर संघाने केली ६३ पदकांची कमाई
गोंदिया (Police Sports Competition) : नागपूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२४ चे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर विजेत्या खेळाडूंना पुरस्कार वितरीत करून स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा पोलिस संघाने चौफेर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तब्बल ६३ पदकांची कमाई केली. या (Police Sports Competition) विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेवर चंद्रपूर जिल्हा पोलिस संघाचे वर्चस्व राहिले. विशेष म्हणजे, (Chandrapur District) चंद्रपूर संघाने १७ सुवर्ण तर गडचिरोली संघाने १९ व नागपूर संघाने २१ सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
नागपूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२४ गोंदिया येथे घेण्यात आली. या (Police Sports Competition) स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्हा पोलिसांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत १० हजार मीटर दौड, ४०० मीटर दौड, २०० मीटर दौड, उंची उडी, थाळी फेक, गोळा फेक, तिहेरी उडी, बॉक्सींग, फुटबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, हॉकी आदि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. सर्वच खेळांच्या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्यात.
पोलिस खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघाचे नाव लौकिक करण्यासाठी खेळाडू प्रवृत्तीचा परिचय देत सर्वोकृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान (Chandrapur District) चंद्रपूर जिल्ह्याच्या संघाने या स्पर्धेवर दुसर्या दिवसापासून आपले वर्चस्व कायम ठेवले. अखेरपर्यंत चंद्रपूर संघाने १७ सुवर्ण पदकासह तब्बल ६३ पदकाची कमाई केली. या (Police Sports Competition) संघाना एकूण ३२४ गुण प्राप्त झाले आहेत. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्हा संघाने १९ सुवर्ण पदकासह ४९ पदकाची कमाई करीत २३२ गुण प्राप्त करुन पदक तालिकेत दुसरे स्थान प्राप्त केले. नागपूर ग्रामीण संघाने सर्वाधिक २१ सुवर्ण पदक पटकाविले असून २०० गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा संघ ३९ पदकासह १७३ गुण प्राप्त करून चौथ्या क्रमांक, भंडारा १२ पदकासह १५५ गुण घेवून ५ वा क्रमांक तर २२ पदकाची कमाई करीत वर्धा जिल्हा पोलिस संघाने १३४ गुण प्राप्त करीत पदक तालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला आहे.
अशी आहे पदक तालिका
जिल्हा – सुवर्ण – कास्य – रौप्य
चंद्रपूर – १७ – २५ – २१
गडचिरोली – १९ – १३ – १७
नागपूर (ग्रा) – २१ – ३ – ४
गोंदिया – १० – १२ – १७
भंडारा – ६ – ०० – ६
वर्धा – ९ – ७ – ६