देशोन्नती वृत्तसंकलन
घुग्घुस (Nitin Gadkari) : किशोर जोरगेवार हे अपक्ष आमदार असताना त्यांनी चंद्रपूर विधानसभेचा (Chandrapur Assembly) प्रचंड मोठा विकास केलेला आहे. आता ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही किशोर जोरगेवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून पाठवल्यास या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलेल हा माझा विश्वास आहे. चंद्रपूर विधानसभा नव्हे तर चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा समृद्ध व संपन्न असा जिल्हा होईल, असा विश्वास आज येथे गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर विधानसभा अंतर्गत असलेल्या घुघुस येथे आयोजित किशोर जोरगेवार यांच्या प्रचार सभे करिता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) घुघुस येथे आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत आमदार किशोर जोरगेवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा, ओबीसीचे ज्येष्ठ नेते अशोक जीवतोडे, आदिलाबाद चे खासदार नागेश गोडाम, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष नितीन भटरकर, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, महिला जिखा प्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर जिल्हाध्यक्ष भारत गुप्ता, विवेक बोढे, यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना नितीन गडकरी *Nitin Gadkari) म्हणाले की निवडणुकीमध्ये सुद्धा जात- पात धर्म, पंथ न पाहता किशोर जोरगेवार यांच्यासारखा सर्वोत्तम नेता आपण निवडायला हवा. संविधानात कोणीही बदल करू शकत नाही. संविधानातील मूलभूत तत्व याला कोणीही बदलू शकत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी आताया खोट्या प्रचाराला बळी नपडता योग्य उमेदवार व योग्य पक्ष निवडून देणे या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली गरज आहे असे मनोगत यावेळी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.