ब्रह्मपुरी(Chandrapur):- येथील डॉ. बिंजवे दाम्पत्याची मुलगी डॉ. ईशा घनश्याम बिंजवे हिने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ब्रह्मपुरी-वडसा महामार्गावरील वैनगंगा नदीत(Wainganga River) पुलावरून उडी घेवून आत्महत्या(suicide) केल्याची घटना उघडकीस आली.
डॉ. ईशा हिने नुकतीच एमबीबीएसची पदवी प्राप्त केली
सदर युवती पुलावर उभी असल्याचा व नदीतून वाहत जात असल्याचा व्हिडिओ (Video)समाज माध्यमावर व्हायरल(Viral) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. ईशा हिने वडीलांना फिरायला जात असल्याचे सांगून Activa गाडीने ती वडसा मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर गेली. पुलावर गाडी उभी करून तिने चप्पल व मोबाईल काढून ठेवले. यानंतर तिने पुलावरून नदीत उडी घेतली. नदीतून युवती वाहत जात असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यामावर व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत दुचाकी, चप्पल व मोबाईल ताब्यात घेतले. सदर घटना वडसा पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने त्यांना माहिती देण्यात आली. डॉ. ईशा हिने नुकतीच एमबीबीएसची पदवी प्राप्त केली होती. तिने आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका का घेतली, याबाबतचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. दरम्यान, गडचिरोलीच्या रेस्क्यू टीमला पिंपळगाव,(खरकाळा) हद्दीत तिचा मृतदेह मिळाल्याची माहिती आहे. पुढील तपास वडसा पोलीस करीत आहे