संचमान्यतेचे सुधारित निकष व दर्जावाढ करण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा
चंद्रपूर (Chandrapur Education) : शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी काढलेले शिक्षकांवर अन्याय करणारे संचमान्यतेचे सुधारित निकष व प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्याबाबतचे शासन तात्काळ रद्द करा, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या (Teachers Union) वतीने विदर्भात ५ जुलै २०२४ रोजी धरणे / निदर्शने आंदोलन (Protests agitation) करण्यात येणार आहे. याबाबत विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांची मंत्रालय येथे भेट घेऊन प्रांताध्यक्ष व सरकार्यवाह यांच्या संयुक्त सहीचे निवेदन सादर केले.
शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष निश्चित केले असून या शासन निर्णयामधील प्रस्तावित बाबींमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याने सदर शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी राज्यातील सर्व शिक्षकवर्गाकडून होत आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विदर्भात ५ जुलै २०२४ रोजी धरणे/निदर्शने आंदोलन
प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जावाढ करण्यात आली तर खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणार नाही. (Chandrapur Education) तेथील अनेक शिक्षक अतिरिक्त होतील आणि कालांतराने खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा बंद होतील. यामुळे सदर शासन निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा असून त्यांचे भविष्य धोक्यात टाकणारा आहे. त्यामुळे १५ मार्च २०२४ रोजीच्या दोन्ही शासन निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये पसरलेला रोष बघता शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने धरणे / निदर्शने आंदोलन शुक्रवार, दिनांक ५ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत विदर्भातील सर्व शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक (नागपूर / अमरावती) कार्यालयासमोर करण्यात येत येणार आहे.
याबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव, आयुक्त (शिक्षण) यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख, सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात ५ जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांना देण्यात आले. याप्रसंगी कुंदन मॅडम यांच्यासोबत याबाबत व इतर विषयांवर आमदार अडबाले यांनी चर्चा केली.
५ जुलैला होणाऱ्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे / निदर्शने आंदोलनामध्ये (Protests agitation) मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षक – कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जगदीश जूनगरी, लक्ष्मणराव धोबे, केशवराव ठाकरे, श्रीहरी शेंडे, जयंत टोंगे, सुरेंद्र अडबाले, नामदेव ठेंगणे, सुनील शेरकी, दिगांबर कुरेकार, मनोज वासाडे, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, अनिल कंटीवार, शालिक ढोरे,आनंद चलाख, गुरुदास चौधरी, देवराव निब्रड, नितीन जीवतोडे, मारोतराव अतकरे, दीपक धोपटे, मंजुषा घाईत, वसुधा रायपुरे, रंजना किन्नाके यांनी केले आहे.