– ट्रॅक्टरच परवडला, दिवसेदिवस नवनवीन प्रयोगाला पसंती
चंद्रपूर (Chandrapur) :- कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. दिवसेंदिवस नवनवीन प्रयोग होत आहेत. त्यामुळे पारंपरिक शेतीला (traditional agriculture) काही शेतकरी बगल देत आहेत. मोठे शेतकरी बैलजोडीचा (bullocks) वापर करण्याऐवजी ट्रॅक्टर (tractor) खरेदी करून शेतीची कामे करतात. परंतु, अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर खरेदी करणे व वापर करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. मोठ्या शेतकऱ्यांसाठी बैलजोडीपेक्षा ट्रॅक्टर वापरणे सोपे ठरत आहे. जिल्ह्यात अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी आहेत. पाच हेक्टरवरील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात बागायतीचे प्रमाण कमी आहे. खरिपानंतर रब्बी हंगामात भाजीपाला कडधान्य लागवड केली जाते. जिल्ह्यातील पिके पावसावर अवलंबून असून, खरिपातील लागवडीच्या कामासाठी वर्षभर लागणारी बैलजोडी परवडणारी नाही
– ट्रॅक्टरची मागणी वाढली
ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून अनुदान (Grant from Govt) मिळते. त्यामुळे खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्रॅक्टर खरेदी करून स्वतःच्या शेतीसाठी वापरून अन्य शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देणे परवडत आहे. वेळ, श्रम, पैसा यांची बचत होत असल्याने वापर वाढला आहे.
– पशुधन झपाट्याने घटत आहे
शिवाय नांगरणीसाठी तासावर भाड्याने ट्रॅक्टर उपलब्ध होत असल्याने फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बैलजोडींचे प्रमाण कमी झाले आहे. पशुधन झपाट्याने घटत आहे. बैलांना सांभाळणेही कठीण झाले आहे.
जिल्ह्यात बैलाची चांगली धष्टपुष्ट जोडी शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांत खरेदी करता येते. यापेक्षा कमी किमतीतही जोडी मिळते. तात नांगरणी, चिखलणीसाठी तसेच ओझे वाहण्यासाठी कष्टाची बैलजोडी ३० ते ४० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होत आहे. बैलगाडी शर्यतीसाठी वापरली जाणारी बैलजोडी एक लाखाहून अधिक किमतीत मिळते. मात्र संगोपन करावे लागत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरला प्राधान्य (Tractor preferred) देत आहेत