घरात कुणीच नसल्याने जीवितहानी टळली
ब्रम्हपुरी(Chandrapuri) :- ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापुर ग्रामपंचायत हद्दीतील एका कौलारू घराला शॉर्टसर्किटमुळे
(short circuit)आग लागल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान घडली आहे. या आगीत(fire) संपूर्ण घर जळून खाक झाले. त्या दरम्यान घरात कोणाही उपास्थित नसल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी (loss of life) झालेली नाही. मात्र लाखो रुपयांचे साहित्याचे नुकसान झाले आहे.
घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून नष्ट
उदापूर येथील ५३ वर्षीय महानंदा विनायक भानारकर ह्या आपल्या मुल व सुनासोबत ह्या घरामध्ये वास्तव्य करत होत्या. मंगळवारी त्या आपल्या संपूर्ण परिवारासोबत तालुक्यातील चौगान येथे लग्नासाठी गेल्या होत्या. तेव्हा सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या दरम्यान वर शॉर्ट सर्किट ने अचानक आग लागली व पाहता पाहता ही आग संपूर्ण घरात पसरली. घराला आग लागलेली दिसताच उदापूर येथील गावकर्यांनी अग्निशमन दलाला (fire brigade) याची माहिती दिली. अनेक ग्रामस्थ युवक यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. अग्निशमन दलाच्या सदस्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. या घटनेत घरातील सर्व संसार उपयोगी वस्तू जळून नष्ट झाल्या आहेत. घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस (Police) यांना दिली आहे. तलाठी यांनी आगीतील नुकसानीचा पंचनामा केला आहे. दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.