चंद्रपूर (Chandrapur firing case) : चंद्रपूर शहरातील रघुवंशी व्यापारी संकुलातील गोळीबार प्रकरणाची घटना ताजी असताना बल्लारपूर शहरात एका कापड व्यापाऱ्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. ऐवढेच नाही तर दुकानात पेट्रोलबॉम्ब (petrol bombs) टाकून दहशत निर्माण केली. दोघे हल्लेखोर दुचाकीने येऊन ही गंभीर घटना घडवून हल्लेखोर पसार झाले. ही (firing case) घटना बल्लारपूर शहरातील गांधी चौक मधील गजबजलेल्या व्यापारी पेठेत आज ( दि. ७ ) रविवारी सकाळी १0.30 वाजता दरम्यान घडली.या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद केली आहे.
कापड दुकानावर हल्ला, नोकर जखमी
येथील गोळीबाराच्या घटनेत दुकानातील नोकर कार्तिक साखरकर ( २५ ) रा.बल्लारपूर हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. (Chandrapur Police) बल्लारपूर शहरात गांधी चौक परिसरात मोठी व्यापार पेठ आहे. येथे सर्वात जुने व नामांकित मोतीलाल प्रभुलाल मालू कापड दुकान आहे. या प्रतिष्ठानचे चालक अभिषेक मालू यांनी आज रविवारी सकाळी १0 वाजता दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर नोकर कार्तिक सफाई करत होता. अर्ध्या तासात हल्लेखोर दुचाकी वाहनाने दुकानासमोर आले.ध्यानिमनी नसताना त्यांनी दुकानदाराच्या पेढीवर सुतली बॉम्ब व पेट्रोल बॉम्ब (petrol bombs) टाकला. लगेच (firing case) हल्लेखोरांनी गोळीबाऱ्याच्या तीन फैरी झाडल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेत नोकर कार्तिक साखरकर याच्या पायला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला जखमी अवस्थेत तातडीने चंद्रपूर येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
दुचाकीने आले होते हल्लेखोर
बल्लारपूर येथील गजबजलेल्या व्यापारी पेठेत भर दिवसा ही घटना घडल्यामुळे व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद केली.या घटनेची माहिती होताच नागरिकांनी घटना परिसरात मोठी गर्दी केली. गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोळसांनी दंगा नियंत्रक पथकला पाचारण केले. (firing case) घटना स्थळाला चंद्रपूरच्या अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू , उपविभागीय पोलीस अधिकारी, बल्लारपूरचे पोलीस निरक्षक आसिफराजा बी. शेख यांनी (Chandrapur Police) पोलीस ताफ्यासह भेट दिली. पोलीस या घटनेतील फरार आरोपीच्या मागावर आहे.
बल्लारपूरातील या घटनेला आपसी आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याची चर्चा
बल्लारपूर शहरातील मोतीलाल प्रभुलाल मालू कापड दुकानाला २0२3 मध्ये अचानक आग लागली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दुकान जळून आर्थिक नुकसानीला मालू परिवाराला समोरे जावे लागले होते. याच दुकान मालकाला २0 जून २0२४ रोजी दुकान बंद करून घरी जाताना लुटण्याचा प्रकार घडला होता. मात्र नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले होते. पुन्हा १५ दिवसात आजची गंभीर घटना घडली. या घटनेमागे आपसी आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा केली जात आहे. याच व्यापारी प्रतिष्ठान संदर्भात तीन घटना घडून देखील आरोपी पर्यंत पोलीस पोहचले नाही. याबाबत तर्कवितर्क केले जात आहे. आता मात्र (Chandrapur Police) पोलिसांना योग्य दिशेनी तपास करून आरोपीला जेरबंद करण्याच्या मानसिकतेत यावे लागेल.हे मात्र तेव्हढेच खरे आहे.