जनावरांची अवैध वाहतूक करणारी वाहने पकडली
नागभीड (Chandrapur): जनावरांची अवैध (illegal) वाहतूक करणारी तीन वाहणे पकडण्यात नागभीड पोलिसांनी यश आले. या तीन वाहनात १२ गोवंशीय जनावरे आढळून आली. येथील रेल्वे (Railway) क्रॉसिंगजवळ रविवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एम एच ३४ बी झेड १४४१ या महिंद्रा पिकअप (Mahindra Pickup) वाहनात ४ बैल,एम एच ३६ एए २८११ या वाहनात ४ बैल तर एम एच ३६ एए २८८४ या वाहनात ४ बैल असे एकूण १२ बैल आढळून आले. या वाहनातून जनावरांची (animals) अवैध वाहतूक होत आहे अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी (police) रेल्वे क्रॉसिंगवर नाकेबंदी करून बाहने अडविली.
जनावरांची किंमत १लाख २० हजार रुपये असल्याचे निष्पन्न
झडतीत वाहनांची किंमत २ लाख १० हजार तर जनावरांची किंमत १लाख २० हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले.नागभीड पोलिसांनी अक्सर सय्यद अली सय्यद (४२) , ब्रह्मपुरी (Brahmapuri), देवदास गोमाजी नेवारे (४०) साकोली जि.भंडारा (Bhandara), धनराज लक्ष्मण बडवाईक (४०) साकोली जि.भंडारा, तोसिफ आसिक पठाण (२२) साकोली जि.भंडारा यांचे विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाही (action) ठाणेदार विजय राठोड यांचे मारगदर्शनाखाली सपोनी दिलीप पोटभरे, पोलिस अंमलदार अजित शेंडे, रोहीत तुमसरे, गजानन मडावी यांनी केली.