Chandrapur :- येथील मृदू व जलसंधारण विभागाच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांनी चंद्रपूर गडचिरोली इरिगेशन असोसिएशनचे (Gadchiroli Irrigation Association)अध्यक्ष इंद्रकुमार उके यांच्याविरोधात बनावट व खोटी कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविल्याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर उके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
कंत्राट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्र वापरल्याची तक्रार
बनावट कागदपत्रांच्या आधारे निविदा घेत आठ कोटींपेक्षा अधिकच्या देयकाची उचल केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे . मागील वर्षभरापासून चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेलफेअर (Contractor Welfare) असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रकुमार महाजन उके आणि जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांविरोधात संघर्ष पेटला होता . दोन्हीकडून एकमेकांविरोधात विभागातील वरिष्ठांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या होत्या . त्यानंतर जलसंधारण अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांच्या कारभाराची अंतर्गत चौकशी करून पोलिसात तक्रार देणे सुरू केले . याआधी एका कंत्रातदारावर गुन्हे दाखल करण्यात आले . आता थेट कंत्राटदार असोसिएशनच्या अध्यक्षा वर गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे .