- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघातून
मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव
– प्रतिभा धानोरकरांचा एकतर्फी विजय
– २ लाख ६० हजार विक्रमी मताधिक्याची नोंद सहाही विधानसभा मतदारसंघात आघाडी
– देशोन्नती विशेष मुलाखत | विजयी उमेदवार हा विजय शेतकरी, बेरोजगारांना समर्पित
– नवनिर्वाचीत खासदार प्रतिभा धानोरकर
चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्य घेत विजयी झालेल्या महाविकास आघाडीच्या अर्थात काँग्रेसच्या उमेदवार ( Congress candidate ) प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar ) यांनी आपला हा विजय सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार आणि बेरोजगार बांधवांना समर्पित असल्याचे दै, देशोचतीशी बोलतांना सांगीतले. प्रचंड मोठ्या संख्येच्त्या मताधिक्य मिळविण्याबाबत बोलतांना त्या म्हणाल्या की, प्रचाराच्या दरम्यान कायमच एक स्टेटस ठेवला होता, की संघर्ष जेवढा मोठा राहील जीत तेवढीच शानदार राहील, आणि त्या पध्दतीताच ऐतिहासीक विजय (historic victory) हा लोकसभा क्षेत्रातून मिळाला आहे. मुनगंटीवार सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करता येईल अशी अपेक्षा होती का यावर बोलतांना त्या म्हणाल्या की, आतापर्यंत धानोरकर कुटूंबातून जेव्हा जेव्हा निवडणूकीत उभे राहीले तेव्हा तेव्हा कॅबिनेट मंत्री असलेल्यासोबत लढत झाली. पती दिवंगत खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी त्यावेळी केंद्रीय कॅबीनेट मंत्री असलेले हंसराज अहिरयांना पराभूत केले होते. संजय देवतळेंना पराभूत केले. मंत्र्यांना पराभूत करण्याचा धानोरकर कुटूंबांचा आगळवेगळा इतिहास आहे, असे सांगत मुनगंटीवार हे देखील मंत्री आहेत, हे माहिती होते. त्यामुळे मुनगंटीवार यांच्यासारख्या दिग्गज मंत्र्यांचा आता मी पराभव केला आहे, अश्या शब्दात प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वंचित बहुजन आघाडीची घोडदौड रोखली
चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha ) मतदार संघात २०२४ च्या निवडणूकीत तिसरा उमेदवार निर्णायक ठरू न शकल्याने येथे काँग्रेस विरुध्द भाजपा अशी थेट लढत झाली. यावेळी वंचित बहुजन आधीचे राजेश बेले यांना केवळ २१ हजार ९८० मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस- भाजपा अशी झालेली थेट लढत काँग्रेसच्च्या फायद्याची ठरली. २०१९ मध्ये वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी १ लाखाहून अधिक निर्णायक मते घेतली होती. यावेळी मतांची आकडेवारी प्रचंड घटली असल्याचे दिसून आले.
चंद्रपुरात जल्लोष, फटाक्यांची आतीषबाजी
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Candidate Pratibha Dhanorkar) या २ लाख ६० हजार इतक्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सायंकाळी चंद्रपुरात नवनिर्वाचीत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समवेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य विजयी रॅली काढली, यावेळी कार्यकत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा केला.
भाजपच्या पराभवाची कारणे
राज्याचे हेवीवेट मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून झालेल्या पराभवामागे प्रामुख्याने यावेळी महाराष्ट्रात असलेली मोदी विरोधाची लाट आणि त्यासोबत प्रचारादरम्यान झालेले वादग्रस्त वक्तव्य आणि वणी, आर्णी या मतदार संघाकडे त्यांचे फारसा नसलेला जनसंपर्क याबाबी कारणीभूत ठरल्याचे प्रथमदर्शनी बोलल्या जात आहे. विकासाच्या बाबतीत ते अग्रेसर राहीले मात्र लोकसभेसाठी विकास त्यांना तारू शकला नाही.
मुनगंटीवार यांचा लोकसभा मैदानातील हा तिसरा पराभव
चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला मात्र त्यांचा लोकसभा निवडणूकीतील हा पहिलाच पराभव नसून ते याआधी दोनदा पराभूत झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित नेते व वजनदार मंत्री म्हणून मुनगंटीवार यांची ओळख आहे. त्यांनी सलग ५ वेळा विधानसभा निवडणूका जिंकल्या आहेत मात्र जेव्हा ते लोकसभेसाठी मैदानात उतरतात तेव्हा त्यांच्या वाट्याला पराभव आलेला आहे. याआधी १९८९ मध्ये झालेल्या निवडणूकीत सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनी ५० हजार ४५७ मतांनी पराभव केला होता तर त्यानंतर १९९१ मध्ये देखील काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनीच ८९ हजार ८२६ मतांनी पराभव केला होता. आता २०२४ मध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी २ लाख ६० हजार ४०६ इतक्या मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला.