गोंडपिपरी (Chandrapur police) : गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सदर घटना ही रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. माहिती मिळताच गावकरी आणि (Chandrapur police) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोधमोहीम हाती घेतली. मात्र वृत्त लिहेपर्यंत मृतकांचा शोध लागला नाही.
गोंडपिपरीतील दोन मुले तलावात बुडाले
गौरव विलास ठाकूर वय १४ वर्ष राहणार गोंडपिंपरी शिवाजी चौक, शौर्य भास्कर पिंपळशेंडे वय १५ वर्ष रा. गोंडपिंपरी शिवाजी चौक अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी सकाळी बारा वाजता दरम्यान वार्डातीलच काही मुले फिरायसाठी गेल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचां मोह आवरला नाही. चिमुकले पोहण्यासाठी तलावात गेले तेथील काही मुले घरी परतले तर दोघे बुडाले. मात्र भीतीपोटी ईतर चिमुकल्यांनी ही घटना घरच्यांना सांगितली नाही.
पोलिस पथकाची शोधमोहीम सुरू
बेपत्ता मुलांच्या घरच्यांनी शोधाशोध केली असता माहिती काढली असता पोहायला गेलेले समजले. कुटुंबीयांनी तलावाकडे रात्री ८ वाजता दरम्यान धाव घेतली.तलावाच्या बाहेर कपडे आढळले असून कपड्यांची ओडख पटली आहे. घटनेची माहिती मिळताच (Chandrapur police) गोंडपिंपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर हजर झाले. मृतदेह शोधण्यासाठी पथकाला प्राचारण करण्यात आले आहे. मात्र रात्र असल्याने अद्यापही पथक पोहोचले नाही. परंतु स्थानिक मासेमारांच्या सहकार्याने शोध मोहीम सुरू आहे. त्या मुलांचा शोध लागला नाही या घटनेमुळे गोंडपिपरीत शोककडा पसरली आहे.