चंद्रपूर (Chandrapur) :- नागपूरहून चंद्रपूरकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने उभ्या ट्रकला जबर धडक दिल्याने एसटी बस वाहक जागीच ठार झाला असून चालकासह तब्बल 13 प्रवासी गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना रात्री उशिरा 12.30 वाजताच्या दरम्यान घडली . संदीप मुरलीधर वनकर असे मृतक वाहकाचे नाव आहे . दत्तात्रय मधुकर इंगोले असे जखमी चालकाचे नाव आहे .
उभ्या ट्रक ला एसटी बस ची धडक
चंद्रपूर आगारची एसटी बस (क्रमांक एमएच 14 के ए 8587) ही नागपूरहून चांद्रपूरकडे येत असताना पडोली जवळील हायटेक फार्मसी महाविद्यालयासमोरील नाल्यावर उभ्या असलेल्या एक नादुरुस्त मालवाहक ट्रक ( क्रमांक एमएच 31 सी क्यू 3171) ला एसटी बसने मागून धडक दिली . ही घटना आज शनिवारी पहाटे 12.30 वाजताच्या सुमारास घडली . अपघाताच्या (Accident)वेळी बस मध्ये 16 प्रवासी प्रवास करीत होते . एसटी बसची धडक वाचकाच्या बाजूने बसल्याने वाहकाचा जागीच मृत्यू झाला तर चालकाचे पाय तुटले आणि 13 प्रवासी जखमी झाले . पडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले . ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी राख वाहून नेणारा ट्रक पलटी झाला होता व ट्रेकमधील राख मुख्य रस्त्यावर पसरली. त्यामुळे अन्य वाहन गेले की राख उडत होती व धुक्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याने वाहनचालकला पुढचे काहीच दिसत नव्हते. यामुळे येथे अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे .