बल्लारपूर वन विभागाच्या पथकांची कारवाई
चंद्रपूर(Chandrapur):- बल्लारपूर वन परीक्षेत्रात एका नरबक्षी वाघाने(tiger) चार जणांचा बळी घेतला होता. यामुळे नागरिकांत वाघाची दहशत(terror) निर्माण झाली होती. नागरिकांनी वन विभागांविरोधात आक्रोश व्यक्त केला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी कारवा – बल्लारपूर जंगलात(Ballarpur Forest) ट्रॅप कॅमेरे (Trap cameras) लावले होते. अखेर चार जणांचा बळी घेणारा टी ८६ एम नर वाघाला जेरबंद करण्यात बल्लारपूर वन विभागाला सोमवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान यश आले. ही कारवाई बल्लारशाह वन विभागाच्या पथकाने फत्ते केली.
कारवा जंगलालगत लावला होता सापळा
बल्लारपूर वन विभागात(Forest Department) नरभक्षी वाघाने दोन महिन्यापूर्वी कारवा – बल्लारपूर जंगलात चांगलाच धुमाकूळ घेतला होता. या वाघाने आजतगायत चार जणांचा बळी घेऊन वन विभागाला जेरीश आणले होते. यामुळे या नरभक्षी(cannibals) वाघाला पकडण्यासाठी बल्लारपूर प्रादेशिक वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावून मोहीम सुरु केली होती. यासाठी वन विभागाचे कर्माचारी रात्रदिवस गस्त करत होते. गस्ती दरम्यान टी-८६-एम नरभक्षी वाघ कारवा-बल्लारपूर जंगलात
ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आला.
वाघाला गणद्वारे बेशुद्ध केले
यावेळी अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (Andhari Tiger Reserve) वन्यजीव उपचार केंद्राचे पशुवैद्यकिय अधिकारी (Veterinary Officer) डा. कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला गणद्वारे बेशुद्ध केले. बेशुद्ध वाघाची वैद्यकिय तपासणी करून जेरबंद करण्यात आले. सदर वाघ १० वर्षाचा असून पिंजऱ्यात पकडून वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले. ही कारवाई मध्य चांदा वन विभागाच्या (Chanda Forest Division) उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे, बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, क्षेत्र सहायक के.एन. घुगलोत, ए.एस.पठाण, पी.व्ही.रामटेके, एस.एम.बोकडे, आर. एस.दुर्योधन, डी.बी.मेश्राम, ए.बी.चौधरी, एस.आर.देशमुख, बी.एम.वनकर, पी.एच.आनकडे,टी.ओ.कांबळे आदींच्या पथकाने नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची कारवाई केली.