राजुरा (Chandrapur Tiger) : बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील (Forest area) कळमणा उपक्षेत्रामधील क्षेत्रीय कर्मचारी हे वनात गस्तीवर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 571 मध्ये आज दिनांक 8 मे रोजी सकाळी 8 वाजताचे सुमारास वाघाचा बछडा मृता अवस्थेत आढळुन आला. सदर वाघाचा बछडा ही मादि असुन, तिचे वय अंदाजे 1 वर्ष होते. पुढील कार्यवाही करण्याकरीता मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडु धोत्रे यांना बोलावुन यांचे समक्ष पंचनामा नोंदवुन वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम 1972 अन्वये प्राथमीक वनगुन्हा क्रमांक 08945/223619 दिनांक 08.05.2024 जारी करुन मृत वाघाचे बछडयाचे शव ताब्यात घेण्यात आले. शवविच्छेदनाकरीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, (Chandrapur Tiger) चंद्रपुर येथे नेण्यात आले.
मृत बछडयाचे सिलबंद नमुने
मृत बछडयाचे शवाचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, (Veterinary Officer) पशुवैद्यकीय अधिकारी, TTC चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले असुन सदर बछड्याचा मृत्यु मोठ्या वाघाच्या हल्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे. सदर प्रकरणात पुढील तपासा करीता मृत बछडयाचे सिलबंद नमुने घेण्यात आले. ते रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे.
रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांचे सहकार्य
या प्रकरणाचा पुढील तपासामध्ये (Forest Department) चांदा वनविभाग, चंद्रपुरचे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह, नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत. सदर कारवाई पुर्ण करण्याकरीता बि. टि.पुरी, क्षेत्र सहाय्यक, कळमणा व वनरक्षक एम.जी.धाईत, के.एस. पोडचलवार, एस.पी. नन्नावरे व रोजंदारी वनसंरक्षण मजुर यांनी सहकार्य केले.