- सिंगारगोंदी नागरीकांच्या नशिबी अजूनही नाल्यांच गढूळ पाणी !
चंद्रपूर (Chandrapur) अमृतमहोत्सवी (Amritmahotsavi) वर्ष मोठ्या थाटात साजरा करणाऱ्या राज्यातील अनेक खेडेगावात मुलभूत सोयी-सुविधा सह विविध योजना पोहोचल्या नाहीत. दारीद्र्य रेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची (Crores ) उधळपट्टी करणाऱ्या सरकारला (government) गरिबांचे जीवनमान उंचवता आले नाही. गावात कुठल्याही सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत, राहायला पक्के घर नाही, काहींना पडक्या कुडा-मातीच्या वास्तव्य आहे. संघर्षमय (confrontational) जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांना स्वच्छवशुद्ध पाणी कधी प्यायला मिळाले नाही. गावात एक बोरवेल असून त्या बोरवेल (Borewell) मधून हंडाभर पाणी निघत नाही. वर्षभर नाल्यातील गढूळ, दूषित पाणी प्यावे लागते. शासनाने जलजीवन मिशन योजनेतून निधी मंजूर केले. कंत्राटदाराने फक्त विहिरीसाठी खड्डा खोदून ठेवली आहे. त्यानंतर कोणतेही अजूनही उर्वरित कामे केली नाही. परिणामी येथील आदिवासी बांधवांना नाल्यातील दुषित व गढूळ पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे.
– मागील ६०-६५ वर्षांपासून या वस्तीत हलाखीचे जीवन जगत आहेत.
धक्कादायक प्रकार देशोन्नतीच्या प्रतिनिधीने सिंगारगोंडी गावात भेट देऊन समोर आणले आहे. जिवती तालुक्यातील (Jivati Taluka) भारी पेसा ग्रामपंचायत (Pesa Gram Panchayat) अंतर्गत येत असलेल्या सिंगारगोंदी केवळ पन्नास-साठ लोकसंख्या असलेली १५ घराची छोटीशी वस्ती आहे. मागील ६०-६५ वर्षांपासून या वस्तीत हलाखीचे जीवन जगत आहेत. मुलभूत सोयीसुविधा तर सोडाच प्यायला पाणी नाही, नाल्यातील, गढूळ व दुषीत पाणी असलेल्या झऱ्यात जंगली जनावर, गावातील गुरे-ढोरे व माणसांनाही तेच पाणी प्यायला वापरावे लागत आहे.
– जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांचा आक्रोश राज्यकर्त्यांच्या कानी पडला नाही
जनावरांमुळे पाणी गढूळ होत असल्याने प्यायसाठी पाणी सकाळीच येथील नागरिक भरून घेत असल्याचे सांगतात. शासनाने मंजूर केलेल्या जलजीवन मिशन योजनेतून येथील नागरिकांना योग्य पाणी मिळेल अशी आशा गावकऱ्यांनी केला होती. मात्र प्रशासनाच नाहीत त्यामुळे उच्चशिक्षित किंवा ढिसाळ नियोजन आणि कंत्राटदाराच्या ( contractor ) दुर्लक्षामुळे नागरिकांना गढूळ व दुषीत पाणी पिऊन तहान भागवावी लागत आहे. शासकीय योजना फक्त कागदावरच बघायला मिळत आहे. परंतु अंमलात आणली नाही, छोट्याशा वस्तीत शिक्षणाचे महत्त्व फारसे कळले नाही. दहावीनंतर एकही शिकलेला मुलगा गावात आढळला नाही. आजही अनेक मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचे बघायला मिळत असतानाही असह्य वेदना देत जीवन जगणाऱ्या आदिवासी बांधवांचा आक्रोश राज्यकर्त्यांच्या कानी पडला नाही
विहीर खोदली उर्वरित कामे बाकी, कंत्राटदार गायब, जनावरे व नागरिक पितात एकाच नाल्याचे पाणी, उपेक्षित जीवन
हंडाभर भर पाण्यासाठी वणवण गावात अंगणवाडी वगळता शासकीय अधिकारी (Government ) व कर्मचारी (employees) पोहोचला नाही. त्यामुळे शासन- प्रशासनाबद्दल संतापाची लाट पसरली आहे. अजून किती दिवस आम्ही हलाखीचे जीवन जगणार असा प्रश्नही गावातील नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना नाल्यातील दुषित पाणी प्यावे लागत असून अनेक आजारांना त्यांना तोंड द्यावे लागते शासनाने मंजूर केलेली सिंगारगोंदी, मच्छीगुड्यातील जलजीवन योजनांचे कामही अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे महिनाभरापासून बंद पडले आहे.