मूल (Chandrapur):- आज दिनांक ४ मे २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता शिवनी परिक्षेत्रातील कुकडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये मौजा बामणीमाल येथील तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या दीपा दिलीप गेडाम या ३३ वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले.
तातडीची मदत मृत महिलेच्या पतीला दिले ५००००/-रुपये
मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली. वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस वाय बुले, क्षेत्र सहाय्यक नल्लेश्वर, पेंदोर क्षेत्र सहायक शिवनी, प्रधान वन रक्षक मडावी, कोवे, शेख, भारत मडावी ,सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर (Forest labour) व पि आर टी सदस्य हजर होते, याप्रसंगी तातडीची मदत म्हणून ५००००/-रुपये मृत महिलेच्या पतीला दिले.