चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
चंद्रपूर (Sudhir Mungantiwar) : अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे मंदीर, लोकशाहीचे मंदीर असलेले नवीन संसद भवन, जी-20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. तो म्हणजे या सर्व प्रसिध्द इमारतींमध्ये बल्लारपूर येथील (Chandrapur Wood) सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. यात आणखी एक मानाचा तुरा आज रोवला गेला.
भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची अर्थात देशाचे (Prime Minister chair) पंतप्रधान यांची खुर्ची बल्लारपूरच्या लाकडाची (Chandrapur Wood) राहणार आहे, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केल्या. बल्लारपूर येथे महाराष्ट्र वनविकास महामंडळातर्फे देशाचे पंतप्रधान यांच्या कार्यालयाकरीता काष्ठ रवानगी करतांना वनमंत्री मुनगंटीवार बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, वन अकादमीचे संचालक एम.एस. रेड्डी, पियुषा जगताप, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी किशोर जैन, सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर हरीश शर्मा, काशिनाथ सिंह, आदी उपस्थित होते.
आजचा हा कार्यक्रम अतिशय वैशिष्टपूर्ण आहे, असा उल्लेख करून वनमंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ठ पाठवित आहोत, हा चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर आणि वनविभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. बल्लारपूरच्या लाकडापासून (Chandrapur Wood) तयार होणा-या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव, विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे, यात माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. शांती, प्रेम, सद्भावना, सहकार्य यासोबतच चिमूर क्रांतीचा आणि वाघांची भुमी असलेला चंद्रपूर जिल्हा आहे. या वाघाच्या भुमीतून पंतप्रधान कार्यालयासाठी 3018 घन फूट लाकूड दिल्लीला जात आहे.
केवळ पंतप्रधानांचे कार्यालयच नव्हे तर केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीचे सभागृह, विविध देशांसोबत जेथे करार केले जातात तेथील खुर्च्या आणि संपूर्ण फर्निचर बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणार आहे. चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तयार करण्यात आलेला 7 फुटांचा तिरंगा ध्वज आजही Prime Minister chair पंतप्रधान कार्यालयात डौलाने उभा आहे, असे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एफडीसीएम चे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांनी केले. संचालक प्रज्ञा जीवनकर आणि कल्पना चिंचखेडे यांनी तर आभार सहायक व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी मानले.