चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर शहरा अंतर्गत येणाऱ्या म्हाडा येथील निधी अभावी विकास थांबलेला असून म्हाडा अंतर्गत येणारे रस्ते, वीज, नाल्यांची दुरावस्था झाली आहे. याकरीता निधी नसल्याने ही दुरावस्था आणखी वाढत चालली आहे. याकरीता खासदार धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृह निर्माण मंत्री एकनाथजी शिंदे (Deputy CM Eknathji Shinde) तसेच वित्त व उपमुख्यमंत्री तथा नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहून निधीची मागणी केली आहे. चंद्रपूर शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत असून म्हाडा अंतर्गत येणाऱ्या जमिनींवर नविन चंद्रपूर उदयास येत आहे.
परंतु या भागातील रस्ते, नाल्या, वीज व पाणी या मुलभूत गरजांची अतिशय दुरावस्था झाली असून, सदर सोयी उपलब्ध होण्याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांनी पुढाकार घेतला असून, उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री तसेच वित्त मंत्री अजित पवार यांना पत्र लिहून एक हजार कोटी रुपयांचा निधी म्हाडा अंतर्गत विकासकामांकरीता उपलब्ध करुन देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
म्हाडा अंतर्गत अनेक नागरिकांनी कोट्यावधी रुपयांची घरे बांधली आहेत. परंतु त्यांना मुलभूत सोयी पासून वंचित राहावे लागत आहे. भविष्यात म्हाडा अंतर्गत विकास झाल्यास नविन चंद्रपूर म्हणून म्हाडा उदयास येणार आहे.