प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
मुंबई (Chandrasekhar Bawankule) : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) कोकणच्या मतदारांनी पसंती देऊन भाजपा महायुतीला यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) व राज्यातील महायुती सरकारवर मतदारांनी विश्वास दाखविला आहे. याचपद्धतीने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून (BJP Mahayuti) भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे रेकॉर्ड मतांनी विजयी होणार असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule) आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
कोकण पदवीधर मतदारसंघात प्रचार दौरा
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पालघर व ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. पालघर जिल्ह्यातील विक्रमगढ, मनोर, नालासोपारा आणि ठाण्यातील मिरा रोड (पूर्व) या भागात भाजपासह महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (BJP Mahayuti) महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करीत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे, असे सांगून त्यांनी मागील अडीच वर्षातील महायुती सरकारची कामगिरी, लोकहिताचे निर्णय व सरकारने पदवीधरांसाठी आखलेल्या विविध योजना माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले. आ. निरंजन डावखरे यांनी सभागृहात पदवीधरांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना मिळावी यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.