भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले मार्गदर्शन
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chandrasekhar Bawankule) : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशाला वेगाने प्रगतीपथावर नेत असून महाराष्ट्रात सुद्धा महायुतीच्या राज्य सरकारने राज्याच्या विकासाला गती दिली आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सरकारचे विकासकार्य तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचवा आणि राज्याचा हा विकास रथ असाच गतिमान राखण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येण्याची गरज आहे. त्याकरिता आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांना पुन्हा विधानसभे पाठवून पाठवण्यासाठी मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याकरिता कंबर कसा असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले. चिखली विधानसभा मतदारसंघातील (Chikhli Assembly Constituency) पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यास दि. २१ सप्टेंबर रोजी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय कोठारी, सुरेशअप्पा कबुतरे प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्ष व परिवार क्षेत्रातील सर्वच संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समर्थ साथ दिल्यामुळे मी मतदार संघाच्या विकासात योगदान देऊ शकले याबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले. अशीच साथ या निवडणुकीच्या काळात व पुढे देखील सर्वांनी सर्वांकडून मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी (Chikhli Assembly Constituency) विधानसभा निवडणुकीला आपण सर्वजण आत्मविश्वासाने व उत्साहाने सामोरे जाऊया, आपला विजय निश्चित असल्याचे यावेळी आ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
सदर मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी तर सूत्रसंचालन महेश लोणकर यांनी केले. बुलढाणा तालुका अध्यक्ष एड. मोहन पवार यांनी आभार मानले. हॉटेल मीरा सेलिब्रेशनमध्ये पार पडलेल्या या कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी (Chikhli Assembly Constituency) चिखली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा, तालुका व शहर सर्व पदाधिकारी, विविध आघाड्या आणि सेलचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती