प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जनतेला आवाहन
श्री संताजी जगनाडे महाराज समाजभवनाचे भूमिपूजन थाटात संपन्न
चिखली (Chandrasekhar Bawankule) : शहरातील तेली समाजाच्या विकासासाठी आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी घेतलेला पुढाकार व त्यांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद असून त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपण सर्वांनी येत्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आज 21 सप्टेंबर रोजी केले.
आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांच्या विकास निधीमधून चिखली मतदारसंघातील 11 कोटी 65 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यात शहरातील संत श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाजभवनाचे प्रातिनिधिक भूमिपूजन करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांची उपस्थिती होती. याप्रसंगी व्यासपीठावर भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, तेली युवा मंचचे अध्यक्ष रमेश दिवटे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, तेली समाज तालुकाध्यक्ष दत्ता करवंदे, सुरेंद्रप्रसाद पांडे, श्रीरंगअण्णा येंडोले, सुभाष देव्हडे, मुकुंदा येंडोले, सचिव राजेंद्र हरणे, प्रदीप लोखंडे, नाना सोनुने, अशोक भोलाणे, सुभाष डोंबळे, राजेश सराफ, कर्मचारी संघटना अध्यक्ष चंद्रकांत लोखंडे उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) पुढे म्हणाले की, संत श्री संताजी जगनाडे महाराज (Santaji Jaganade Maharaj) समाजभवनासाठी आ. श्वेताताई महाले यांनी 50 लाख रुपयांचा निधी मिळवून दिल्यामुळे तेली समाजाचे त्यांच्याशी कायमचे ऋणानुबंध निर्माण झाले असून या समाजभवनासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास तोसुद्धा मिळवून देण्यासाठी आ. श्वेताताईंच्या बरोबरीने मी प्रयत्न करीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. तेली समाजभवनाच्या बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तेली समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) या वेळी म्हणाल्या की, चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन विकासकार्य करण्याची माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. शहरातील नगरपालिका हद्दीमधील ओपन स्पेसचे अनेक समाज घटकांना व विविध वर्गांना वितरण करून आपण सामाजिक न्यायाचा, सर्व समाजांना व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तेली समाजाने मागणी केल्यानुसार त्यांना (Santaji Jaganade Maharaj) श्री संताजी जगनाडे महाराज समाजभवनाच्या बांधकामासाठी 50 लाख रुपयांचा निधी देऊन मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. तेली समाजाचा स्नेह व सहकार्य मला सदैव मिळेल अशी खात्री आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी या वेळी भाषणातून व्यक्त केली.
या (Santaji Jaganade Maharaj) भूमिपूजन सोहळ्यासाठी चिखली अर्बन बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, नामदेव वाडेकर, चंद्रकांत करवंदे, दत्ता सुरडकर, शाम करवंदे, विठ्ठल करवंदे, कृष्ण पन्हाळे, सोपान करवंदे, पवन हरणे, दिलीप जाधव, विश्वनाथ क्षीरसागर, प्रल्हाद हरणे, दादा जम्मन व्यवहारे, सुषमा राऊत, आनंद माळोदे, गजानन राऊत, विकास गुंजाळकर, शिवा माळोदे, प्रतीक करवंदे, मोहन वाघ, मिलिंद वाघ, अशोक वाघ यांच्यासह तेली समाजबांधव व भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेली युवा मंचचे अध्यक्ष रमेश दिवटे यांनी केले तर अविनाश वेंडोले यांनी आभार मानले