मुंबई (Munjya Movies): अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांचा हॉरर-कॉमेडी (Horror-comedy) चित्रपट (Munjya Movies) ‘मुंज्या’ सध्या बॉक्स ऑफिसवर दबदबा गाजवत आहे. हा चित्रपट दररोज करोडोंची कमाई करत आहे. या चित्रपटाने केवळ 11 दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे, गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला कार्तिक आर्यनचा स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) देखील आपली कमाई करत आहे.
कोणत्या चित्रपटाने किती कमाई?
अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांच्या ‘मुंज्या’ या चित्रपटाने केवळ 4 कोटींच्या कमाईने सुरुवात केली होती. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने देशभरात 35.3 कोटी रुपयांची कमाई केली. ‘मुंज्या’ ने 8 व्या दिवशी 3.5 कोटी, 9व्या दिवशी 6.5 कोटी आणि 10 व्या दिवशी 8.5 कोटींची कमाई केली आहे. आता त्याच्या 11व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. माहितीनुसार, (According to the report) चित्रपटाने दुसऱ्या सोमवारी देशभरात 5.25 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 59.06 कोटी रुपये झाले आहे.